ग्रोझनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रोझनी
Грозный
रशियामधील शहर
ध्वज
चिन्ह
ग्रोझनी is located in रशिया
ग्रोझनी
ग्रोझनी
ग्रोझनीचे रशियामधील स्थान

गुणक: 43°19′N 45°42′E / 43.317°N 45.700°E / 43.317; 45.700

देश रशिया ध्वज रशिया
विभाग चेचन्या
स्थापना वर्ष इ.स. १८१८
क्षेत्रफळ ३२४.१६ चौ. किमी (१२५.१६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर २,७७,४१४
  - घनता ८५५.८ /चौ. किमी (२,२१७ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ


ग्रोझनी (रशियन: Грозный; चेचन: Соьлжа-Гӏала) हे रशिया देशाच्या कॉकेशस भागातील चेचन्या प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. ग्रोझनी शहर सुन्झा नदीच्या काठावर वसले असून २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या २.७२ लाख होती.

१९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर चेचन्याने रशियापासून स्वातंत्र्याची घोषणा केली व त्यानंतर झालेल्या दोन युद्धांमध्ये ग्रोझनीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. दुसऱ्या चेचन युद्धामध्ये रशियाचा विजय झाल्यानंतर हे शहर पुन्हा रशियाच्या अधिपत्याखाली आले. युद्धानंतरच्या काळात येथील बहुसंख्य इमारतींची पुनर्बांधणी केली गेली.

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. तेरेक ग्रोझनी हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत