ज्यू लोक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्रसिद्ध ज्यू व्यक्तींचे कोलाजचित्र. सव्य पद्धतीने: अल्बर्ट आइनस्टाइन, मोशे बेन मायमोन, गोल्डा मायर, एमा लाझारस.
ज्यू लोक किंवा यहुदी लोक (हिब्रू: יְהוּדִים , येहूदिम ) हे ज्यू धर्मीय लोक आहेत. त्यांचा धर्मग्रंथ तोराह आहे. ज्यू, ज्यूइश लोक या नावांनीही हे लोक संबोधले जातात. हे लोक राष्ट्रक, वंशधर्मीय स्वरूपाचा समाज असून प्राचीन काळात मध्यपूर्वेतील इस्रायेली, अर्थात हिब्रू लोकांपासून उत्पन्न झाले[ संदर्भ हवा ]. दुसर्या महायुद्धाच्या काळात हिटलरने त्याच्या नाझी पक्षाद्वारे सुमारे ६० लाख ज्यू लोक ठार मारले.
देशनिहाय लोकसंख्या[संपादन]
अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इस्राईल या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. इ.स. २०१० साली जगभरात ज्यू लोकांची संख्या १,३४,२८,३०० इतकी होती.[१]
इस्रायल - ५७,०३,७००
अमेरिका - ५२,७५,०००
फ्रान्स - ४,८३,५००
कॅनडा - ३,७५,०००
युनायटेड किंग्डम - २,९२,०००
भारत देशामध्ये आजमितीस अंदाजे ५,००० ज्यू धर्मीय व्यक्ती आहेत. यात बेने इस्रायेल, बेनाई मेनाशे, कोचिन ज्यू आणि बेने इफ्रैम या गटांचा समावेश होतो.
हेही पहा[संपादन]
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ↑ द ज्यूइश पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड (२०१०) (ज्यूंची जगभरातील लोकसंख्या (इ.स. २०१०)). ''ज्यूइश व्हर्च्युअल लायब्ररी. (इंग्लिश मजकूर)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
| कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |