स्टेडियम नॅरोडोव्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:Infobox stadium

नॅशनल स्टेडियम

नॅशनल स्टेडियम (पोलिश: Stadion Narodowy) हे पोलंड देशाच्या वॉर्सा शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००८ साली बांधकाम सुरू झालेले व नोव्हेंबर २०११ साली बांधून पूर्ण झालेल्या नॅशनल स्टेडियमची आसनक्षमता ५८,००० असून ते पोलंडमधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. युएफा यूरो २०१२ साठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमसाठी १.९१५ अब्ज झुवॉटी इतका खर्च आला आहे. ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २०१२ स्पर्धेमधील प्रारंभिक सामना, उपांत्य-पूर्व व उपांत्य फेरीचे सामने खेळवले गेले. पोलंड फुटबॉल संघ ह्याच स्टेडियममधून आपले राष्ट्रीय सामने खेळतो.

A Panorama view of the स्टेडियम interior

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]