कुंभमेळा
सामूहिक हिंदू धार्मिक मेळा | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | pilgrimage feast | ||
---|---|---|---|
उपवर्ग | Hindu pilgrimage | ||
स्थान | भारत | ||
महत्वाची घटना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.[१]
दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो.[२] बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.[३]
ऐतिहासिक नोंद
[संपादन]मुगलकालीन कागदपत्रांमध्ये कुंभमेळ्याच्या उत्सवाचे संदर्भ आढळतात. खुलासातू-त-तारीख या सोळाव्या शतकातील ग्रंथात असा उल्लेख असल्याचे इतिहासाचे अभ्यासक नोंदवतात. पण याविषयी सर्वच अभ्यासक एकमताने काही नोंदवतात असे नाही, त्यांच्यामध्येही मत- मतांतरे आहेत.[४]
भाविकांची उपस्थिती
[संपादन]भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यांत हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. इ.स. २००१ साली पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात अधिकृत अंदाजांनुसार ३ ते ७ कोटी भाविकांनी भाग घेतला.[५][६][७]
ज्योतिषीय संबंध
[संपादन]सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते.[८]
शाही स्नान
[संपादन]शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.[९] शाही स्नान म्हणजे एकाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्र स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला जातो. त्याची विशेष शोभायात्रा निघते.[१०] त्यांचे स्नान झाल्यावर नंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात अशी प्रथा प्रचलित आहे.[११]
जागतिक सांस्कृतिक वारसा
[संपादन]कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव / सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही, असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला 'जागतिक सांस्कृतिक वारसा' म्हणून घोषित केले आहे.[४]
साधू समूहाचा सहभाग
[संपादन]कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो.[१२] या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती, त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम-हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पहायला मिळतात.[१३]
- आखाडा संकल्पना'-'
कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात. काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात.
- शैव
- वैष्णव
- उदासीन
- नागा
- नाथपंथी
- परी (केवळ स्त्रियांचा)
- किन्नर (तृतीय पंथीय सदस्य)[४]
असे आखाडे आहेत.
मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले असे मानले जाते. सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचे नियम, आचरण असते. कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते, त्यांना सेवा - सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.[१४]
पर्यटन
[संपादन]कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावले आहे. त्यामुळे कुंभमेळा पहायला केवळ भाविकच येतात असे नाही तर जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटक ही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात. कुंभमेळा हे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.[१५]
चित्रदालन
[संपादन]-
इ.स. १९९८ च्या हरिद्वार कुंभमेळ्यातील नागा साधू
-
इ.स. २००१ प्रयाग कुंभमेळ्यात गंगेवरील पुलावरून जाणारी मिरवणूक
-
कुंभ मेळ्यातील हरियणवी नृत्य
-
कुंभमेळ्यातील साधू बाबा
-
कुंभमेळ्यातील गर्दी
-
कुंभमेळ्यातील एक साधू
-
कुंभमेळ्यात पूजा करणारे संत
-
कुंभमेळ्यात गायीचे पूजन
-
कुंभमेळ्यात सहभागी नागा साधू
-
नागा साधू महिलेला आशीर्वाद देताना
-
कुंभमेळ्यातील एक पूजा
-
कुंभमेळ्यातील गायन
-
कुंभमेळ्यातील भक्तमंडळी
-
कुंभमेळ्यात धार्मिक ग्रंथाचे वाचन
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Shikhare, Damodar Narhar (1962). Svatantra Bhāratācī bharāri. Kulakarṇī Granthāgāra.
- ^ Bhāratīya sãskr̥tikośa. Bhāratīya S̃āskr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.
- ^ MURTY, SUDHA (2018-04-01). GARUDJANMACHI KATHA. Mehta Publishing House. ISBN 9789387789722.
- ^ a b c "कुंभमेळा : मुघलकालीन दस्ताऐवजात कुंभमेळ्याचा पहिला उल्लेख". १५. १. २०१९.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "मिल्यन्स बेद इन हिंदू फेस्टिवल (हिंदू उत्सवात लाखो लोकांचे स्नान)" (इंग्लिश भाषेत). ३० जानेवारी २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "कुंभ मेला पिक्चर्ड फ्रॉम स्पेस (अंतराळातून छायाचित्रित कुंभमेळा)" (इंग्लिश भाषेत). ३० जानेवारी २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "कुंभ मेल ({[लेखनाव".) | प्रकाशक = न्यू सायंटिस्ट | लेखक = कॅरिंग्टन, डेमियन | दिनांक = २५ जानेवारी २००१ | अॅक्सेसदिनांक = ३० जानेवारी २०१२ | भाषा = इंग्लिश }}
- ^ GULZAR (2001-03-01). RAVIPAR. Mehta Publishing House. ISBN 9788184986600.
- ^ "कुंभ में तीसरा शाही स्नान आज, 2 करोड़ लोगों के डुबकी लगाने का अनुमान". १०. २. २०१९.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Dobhal, Bhagwati Prasad (2014-01-01). Vichar Jo Kamyab Rahe (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350487877.
- ^ Nath, Rakesh (2013-07-10). Snan, Kumbh, Puja Aur Yatra: Hindi Satire (हिंदी भाषेत). Vishv Books Private Limited. ISBN 9789350650653.
- ^ नारायण, बद्री (2010). कुंभ मेला और साधु समागम: अमरत्व की खोज (हिंदी भाषेत). पिल्ग्रिम्स पब्लिशिंग. ISBN 9788177699173.
- ^ Vishesh, Pankaj (2013-01-01). Prayag Mahakumbh-2013 (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350483084.
- ^ Nath, Rakesh (2013-07-10). Snan, Kumbh, Puja Aur Yatra: Hindi Satire (हिंदी भाषेत). Vishv Books Private Limited. ISBN 9789350650653.
- ^ नवभारत टाइम्स (१५. १. २०१९). "Kumbh Mela 2019: कुंभ में आए विदेशी सैलानी और साधु, देखें तस ."
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- "सिंहस्थ कुंभमेळा नाशिक-त्र्यंबकेश्वर - अधिकृत संकेतस्थळ".
- "कुंभमेळा.इ-उत्तरांचल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "सिंहस्थ कुंभमेळा २०१५ नाशिक,त्र्यंबकेश्वर".
- कुंभमेळा २०१९ Archived 2020-11-07 at the Wayback Machine.