Jump to content

सानिया मिर्झा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सानिया मिर्जा या पानावरून पुनर्निर्देशित)
सानिया मिर्झा
देश भारत ध्वज भारत
वास्तव्य हैदराबाद, तेलंगण
दुबई, यू.ए.ई.
सियालकोट, पाकिस्तान
जन्म १५ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-15) (वय: ३८)
मुंबई
उंची १.७३ मी (५ फु ८ इं)
सुरुवात ३ फेब्रुवारी २००३
शैली उजवा; एकहाती बॅकहॅन्ड
बक्षिस मिळकत $ ३४,८७,२४४
एकेरी
प्रदर्शन 271–161
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २७ (२७ ऑगस्ट २००७)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन ३री फेरी (२००५, २००८)
फ्रेंच ओपन २री फेरी (२००७, २०११)
विंबल्डन २री फेरी (२००५, २००७, २००८, २००९)
यू.एस. ओपन ४थी फेरी (२००५)
दुहेरी
प्रदर्शन 536–248
अजिंक्यपदे २७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१३ एप्रिल २०१५)
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यफेरी (२०१२)
फ्रेंच ओपन अंतिम फेरी (२०११)
विंबल्डन विजयी (२०१५)
यू.एस. ओपन उपांत्यफेरी (२०१३, २०१४)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०००९)
फ्रेंच ओपन विजयी (२०१२)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२०११, २०१३)
यू.एस. ओपन विजयी (२०१४)
शेवटचा बदल: जुलै २०१५.


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
राष्ट्रकुल खेळ
रौप्य २०१० दिल्ली एकेरी
कांस्य २०१० दिल्ली महिला दुहेरी
आशियाई खेळ
सुवर्ण २०१४ इंचॉन मिश्र दुहेरी
सुवर्ण २००६ दोहा मिश्र दुहेरी
रौप्य २००६ दोहा एकेरी
रौप्य २००६ दोहा संघ
रौप्य २०१० क्वांगचौ मिश्र दुहेरी
कांस्य २०१० क्वांगचौ एकेरी
कांस्य २००२ बुसान मिश्र दुहरी

सानिया मिर्झा ( नोव्हेंबर १५, १९८६, मुंबई) ही एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. सानियाने आजवर ३ ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत तसेच एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. ती भारतामधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू समजली जाते. सध्या सानिया डब्ल्यू.टी.ए.च्या दुहेरी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

सानियाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तर २००६ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. सध्याच्या घडीला सानिया भारताच्या तेलंगण ह्या नव्या राज्याची प्रवर्तक (ॲम्बॅसॅडर) आहे. २०१० साली तिने पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिकशी विवाह केला.

कारकीर्द

[संपादन]

सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासून टेनिस खेळण्यास सुरुवात केली. २००३ मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये प्रवेश केला. डब्ल्यू.टी.ए.च्या क्रमवारीत एकेरीमध्ये ३१ आणि दुहेरीमध्ये १०९ इतका वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. २००५ मध्ये हैदराबाद ओपन एकेरी स्पर्धा जिंकून ती डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.

ग्रँड स्लॅम कारकीर्द

[संपादन]

महिला दुहेरी: २ (१-१)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उपविजयी २०११ फ्रेंच ओपन क्ले रशिया एलेना व्हेस्निना चेक प्रजासत्ताक आंद्रेया लावाकोव्हा
चेक प्रजासत्ताक लुसी ह्रादेका
4–6, 3–6
Winner २०१५ विंबल्डन गवताळ स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस रशिया येकातेरिना माकारोव्हा
रशिया एलेना व्हेस्निना
5–7, 7–6(7–4), 7–5

मिश्र दुहेरी: ५ (३-२)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उपविजयी २००८ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड भारत महेश भूपती चीन सुन तियांतियान
सर्बिया नेनाद झिमोंजिक
6–7(4–7), 4–6
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड भारत महेश भूपती फ्रान्स नथाली डेशी
इस्रायल अँडी राम
6–3, 6–1
विजयी २०१२ फ्रेंच ओपन क्ले भारत महेश भूपती पोलंड क्लॉडिया यान्स
मेक्सिको सान्तियागो गोन्झालेझ
7–6(7–3), 6–1
उपविजयी २०१४ ऑस्ट्रेलियन ओपन Hard रोमेनिया होरिया तेकाउ फ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविच
कॅनडा डॅनियेल नेस्टर
3–6, 2–6
विजयी २०१४ यू.एस. ओपन हार्ड ब्राझील ब्रुनो सोआरेस अमेरिका ॲबिगेल स्पीयर्स
मेक्सिको सान्तियागो गोन्झालेझ
6–1, 2–6, [11–9]

पुस्तके

[संपादन]
  • सानिया मिर्झाने 'Ace against Odds' ही इंग्रजी आत्मकथा लिहिली आहे. सचिन वाघमारे यांनी या आत्मकथेचा 'आव्हानांवर मात' या नावाचा मराठी अनुवाद केला आहे.

बाह्य दुवे

[संपादन]