Jump to content

"देवेंद्र फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
(चर्चा | योगदान)
ओळ १२२: ओळ १२२:
* राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार
* राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार
* रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार
* रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार

==चरित्र==
* लेखिका सुषमा नवलखे : सुषमा नवलखे यांनी फडणवीस यांचं चरित्र लिहिताना त्यांची जडण-घडण कशी झाली, तरुण वयातच ते नागपूरचे महापौर कसे झाले याची माहिती दिली आहे.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

०४:३४, ३ मे २०१६ ची आवृत्ती

देवेंद्र फडणवीस
चित्र:Devendra Fadanvis.jpg

विद्यमान
पदग्रहण
३१ ऑक्टोबर २०१४
मागील पृथ्वीराज चव्हाण

विधानसभा सदस्य
नागपूर नैर्ऋत्य साठी
विद्यमान
पदग्रहण
२००९

विधानसभा सदस्य
नागपूर पश्चिम साठी
कार्यकाळ
१९९९ – २००९

नागपूरचे महापौर
कार्यकाळ
२००४ – २००९

जन्म २२ जुलै, १९७० (1970-07-22)
नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी अमृता
अपत्ये दिविजा (कन्या)
निवास नागपूर
धर्म हिंदू
संकेतस्थळ www.devendrafadnavis.in

देवेंद्र गंगाधर फडणवीस (जन्म: २२ जुलै १९७०) हे भारताच्या भारतीय जनता पक्षील नेते, भाजपचे महाराष्ट्रासाठीचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर शहराच्या नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळ भारतीय जनता पक्षाने त्यांची नेतेपदी निवड केल्याने ते महाराष्ट्र राज्याचे ३१ ऑक्टोबर २००४ पासून मुख्यमंत्री आहेत.

जीवन

‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळं मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असं आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलानं आईला बजावून सांगितलं. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावं लागलं. संघ, जनसंघाच्या संस्कारांचं बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्याचं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा आज प्रत्यक्षात अवतरली आहे.

फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रनं बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावं. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्रनं घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’.

पुढं हा मुलगा लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थानं जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचं. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आलं नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले. कमी वयात महापौर आणि आता मुख्यमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मागे वडिल आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वत:चे कष्टही महत्वाचे आहेत. देवेंद्र अवघ्या 17 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे म्हणजेच गंगाधरपंतांचे निधन झाले. त्यानंतर गंगाधरपंतांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकलं. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला.

त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2009 साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. विशेष म्हणजे, 2004 सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.

विधानसभेतही देवेंद्र यांची कामगिरी कायमच लक्षवेधी राहिली. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी आणि अभ्यासू आणि व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आपली स्वच्छ प्रतिमा कसोशिनं जपली आहे. आजवर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा किंवा राजकीय तडजोडी केल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही. कदाचित या गुणांमुळेच वयाच्या 44 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचले आहेत. आजवर वयाच्या 37 व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री आहेत.

शैक्षणिक पात्रता

  • व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी
  • डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्‌स ॲन्ड टेक्‍निक्‍स ऑफ प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
  • एल्‌एल.बी (नागपूर विद्यापीठ)

राजकीय टप्पे

  • १९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
  • १९९९ ते आजतागायत - विधानसभा सदस्य
  • १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
  • १९९२ नागपूर शहर
  • १९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
  • २००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
  • २०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स
  • २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष

विधिमंडळातील कार्य

  • १९९९ पासून ते २०१४ सालापर्यंत विधिमंडळात आमदार
  • अंदाज समितीचे सदस्य
  • नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य
  • नियम समितीचे सदस्य
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य
  • राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य
  • सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य
  • स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समितीचे सदस्य

गुणविशेष

  • आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असून विश्लेषण करण्याची पात्रता
  • ’इंधन/ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल’ विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रण

सामाजिक योगदान

  • ’ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटॆट फॉर एशिया रीज”चे सचिव
  • नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन
  • नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
  • नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य
  • नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष
  • संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य

आंतरराष्ट्रीय

  • अमेरिकन सरकारच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्‍युरिटी इश्यूज‘ या विषयावर शोधनिबंध सादर
  • अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशव्हिले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे लेजिस्लेचर
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य
  • केनियातील नैरोबी येथे युनायटेड नेशन्स हॅबिटॅटने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
  • चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ, ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्यूज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क‘ या विषयी सादरीकरण
  • डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
  • मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रीजनल मीट‘मध्ये सहभाग
  • युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटॅट‘मध्ये सहभाग
  • रशियात मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
  • स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी ‘युनेस्को‘ डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन ॲन्ड मॅनेजमेंट इन इंडिया‘ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
  • होनोलुलू येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण

देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले पुरस्कार

  • कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा वार्षिक पुरस्कार
  • नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
  • पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला पहिला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार
  • रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार

चरित्र

  • लेखिका सुषमा नवलखे : सुषमा नवलखे यांनी फडणवीस यांचं चरित्र लिहिताना त्यांची जडण-घडण कशी झाली, तरुण वयातच ते नागपूरचे महापौर कसे झाले याची माहिती दिली आहे.

बाह्य दुवे

मागील:
पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
३१ ऑक्टोबर २०१४ – विद्यमान
पुढील:
-