Jump to content

"गणेश उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा अ...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

१३:०३, ३० सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. हा गणेश उत्सव भारतात, महाराष्ट्र या शिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये पण साजरा केला जातो. भारताबाहेरही ब्रिटन, अमेरिका, फिजी, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, कंबोडिया, कॅनडा, ब्रह्मदेश, आणि त्रिनिदाद व टोब्यागो या देशांमध्ये हा उत्सव पण साजरा केला जातो. मुंबई आणि पुण्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग आणि केसरी वाडा. या व्यतिरिक्त दगडूशेठ हलवाई, मंडई, बाबू गेनू आणि जिलब्या मारुती हि काही इतर मोठी मंडळे आहेत. पुण्यात हिरा बाग मंडळ हे भव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई मध्ये लालबागचा राजा हा सर्वात मानलेला गणपती आहे.