Jump to content

बिलासपूर–नागपूर वंदे भारत एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिलासपूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)
बिलासपूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस
माहिती
प्रथम धाव ११ डिसेंबर, २०२२
मार्ग
सुरुवात बिलासपुर
थांबे
शेवट नागपूर
अप क्रमांक २०८२५
डाउन क्रमांक २०८२६
अंतर ४१२ किमी (२५६ मैल)
प्रवासीसेवा
खानपान ऑन-बोर्ड केटरिंग
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉडगेज
वेग १३० किमी/तास

२०८२५/२०८२६ बिलासपूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील ६वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे जी छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यांना जोडते. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर, २०२२ (रविवार) रोजी हिरवा झेंडा दाखवला. १३० किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.[] ही विदर्भातील प्रथम वंदे भारत एक्सप्रेस आहे.

आढावा

[संपादन]

ही ट्रेन भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाते, ती बिलासपूर जंक्शन, रायपूर जंक्शन, दुर्ग जंक्शन, राज नांदगाव, गोंदिया जंक्शन आणि नागपूर जंक्शनला जोडते. ही ट्रेन सध्या आठवड्यातून ६ दिवस ट्रेन क्रमांक २०८२५/२०८२६ वर चालवले जाते.[] [] []

रेक्स

[संपादन]

ही वंदे भारत एक्स्प्रेसची २ री पिढी ट्रेन आहे. या गाडीची निर्मिती मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत पेरांबूर, चेन्नई येथे सुधांशू मणी [३] यांच्या नेतृत्वाखाली इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ने डिझाईन आणि निर्मिती केली होती.

डब्ब्यांची रचना

[संपादन]

२०८२५/२०८२६ बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सध्या १४ वातानुकुलीत खुर्ची यान (एसी चेअर कार) आणि २ कार्यकारी खुर्ची यान (एक्झिक्युटिव्ह चेअर कार) डब्बे (कोच) आहेत. []

एक्वा रंगातील डबे वातानुकुलीत खुर्ची यान दर्शवतात आणि गुलाबी रंगातील डबे वातानुकुलीत कार्यकारी खुर्ची यान दर्शवतात.

2 3 4 6 8 १० ११ १२ १३ १४ १५ १६
२०८२५ | C14 C13 C12 C11 C10 C9 C8 E2 E1 C7 C6 C5 C4 C3 C2 C1 |
२०८२६ | C1 C2 C3 C4 C5 C6 C7 E1 E2 C8 C9 C10 C11 C12 C13 C14 |

सेवा

[संपादन]

२०८२५/२०८२६ बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सध्या आठवड्यातून ६ दिवस चालते आणि ४१२ किमी (२५६ मैल) अंतर ५ तास ३० मिनिटात कापते. या गाडीचा सरासरी वेग ७५ किमी/तास, तर माल अनुज्ञेय वेग (एमपीएस) १३० किमी/तास आहे.[]

वेळापत्रक

[संपादन]

या २०८२५/२०८२६ बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक खाली दिले आहे.

बिलासपुर - नागपूर - बिलासपुर वंदे भारत एक्सप्रेस
२०८२५ स्टेशन्स २०८२६
आगमन प्रस्थान आगमन प्रस्थान
-शून्य- ०६:४५ बिलासपूर जंक्शन १९:३५ -शून्य-
०८:०१ ०८:०३ रायपूर जंक्शन १७:५० १७:५२
०८:४८ ०८:५० दुर्ग जंक्शन १७:१५ १७:१७
०९:०७ ०९:०८ राज नांदगाव १६:४४ १६:४५
१०:२८ १०:३० गोंदिया जंक्शन १५:३६ १५:३८
१२:१५ -शून्य- नागपूर जंक्शन -शून्य- १४:०५

घटना

[संपादन]
  • दगडफेक

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या खिडकीवर अज्ञात व्यक्तीने बुधवार १४ डिसेंबर, २०२२ रोजी दगडफेक केली होती. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या रायपूर विभागांतर्गत दुर्ग आणि भिलाई नगर रेल्वे स्थानकांदरम्यान ही सेमी हाय स्पीड ट्रेन राज्यातील बिलासपूरला जात असताना ही घटना घडली होती.[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ टीम, एबीपी माझा वेब (2022-12-10). "नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये विमानासारख्या सुविधा; जाणून घ्या तिकीट दर". marathi.abplive.com. 2023-01-13 रोजी पाहिले.
  2. ^ Railway, N. C. R. "20825/Bilaspur - Nagpur Vande Bharat Express - Bilaspur to Nagpur SECR/South East Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2022-12-15 रोजी पाहिले.
  3. ^ Aniket. "20826/Nagpur - Bilaspur Vande Bharat Express - Nagpur to Bilaspur SECR/South East Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2022-12-15 रोजी पाहिले.
  4. ^ News, Nagpur (2022-12-14). "775 passengers travel on Nagpur-Bilaspur-Nagpur Vande Bharat Exp on Day-1". Nagpur Today : Nagpur News (इंग्रजी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Nagpur-Bilaspur Vande Bharat Express: Check ticket price, timings, stoppages, train speed and other details". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-12-16 रोजी पाहिले.
  6. ^ Livemint (2022-12-12). "Nagpur-Bilaspur Vande Bharat Express train: Timings, stoppages, other details". mint (इंग्रजी भाषेत). 2022-12-22 रोजी पाहिले.
  7. ^ Marathi, TV9 (2022-12-16). "नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, कुठे घडली ही घटना?". TV9 Marathi. 2023-01-13 रोजी पाहिले.
  8. ^ ब्युरो, साम टिव्ही. "Vande Bharat Train: नागपूरहून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, चार दिवसांपूर्वीच ट्रेन सेवा सुरु". Saam TV | साम टीव्ही. 2023-01-13 रोजी पाहिले.