Jump to content

वाराणसी जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाराणसी
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता वाराणसी, उत्तर प्रदेश
गुणक 25°19′37″N 82°59′10″E / 25.32694°N 82.98611°E / 25.32694; 82.98611
समुद्रसपाटीपासूनची उंची ३१६.८ मी
मार्ग दिल्ली-हावडा रेल्वेमार्ग
लखनौ-वाराणसी मार्ग
लखनौ-रायबरेली-वाराणसी मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७२
विद्युतीकरण होय
संकेत BSB
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर पूर्व रेल्वे
स्थान
वाराणसी is located in उत्तर प्रदेश
वाराणसी
वाराणसी
उत्तर प्रदेशमधील स्थान

वाराणसी जंक्शन हे भारताच्या उत्तर प्रदेशच्या वाराणसी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-कोलकाता ह्या भारतामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्लीकडून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच ईशान्य भारताकडे धावणाऱ्या गाड्या बहुतेक सर्व गाड्या येथे थांबतात.

भारत देशातील उत्तर प्रदेश राज्यातील हे एक भारतीय रेल्वेचे केंद्र आहे व हे वाराणशी कँण्टोंनमेंट रेल्वे स्थानक या नावाने प्रसिद्ध आहे. या स्टेशन मध्ये ९ फ्लॅट फॉर्म आणि १३ ट्रक्स आहेत. या स्टेशनचे जवळच प्रिपेड ऑटो कम टॅक्सी स्टँड आहे. येथे पार्किंग व्यवस्था आहे. या स्टेशनचा कोड BSB आहे.[]

उत्तर पूर्व रेल्वेच्या वाराणसी विभागाचे मुख्यालय येथेच आहे.

व्यवस्थापन

[संपादन]

भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे विभागातील लखनऊ विभागाकडे या स्टेशनचे कांही भागाचे व्यवस्थापन नियंत्रण आहे आणि उत्तर पूर्व विभागाचे वाराणशी विभागाकडे कांही भागाचे व्यवस्थापन नियंत्रण आहे. पूर्वीच्या रेल्वे मंत्री मा. ममता बॅनर्जी यांनी या रेल्वे स्थानकची जागतिक विकसनशील नियोजन (डेवलपमेंट प्रोजेक्ट) मध्ये समावेश केला.[]

इतिहास

[संपादन]

डिसेंबर १८६२ मध्ये हावडा स्टेशन ते बनारस ही पहिली रेल्वे लाइन अस्तीत्वात आली होती.[] ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीच्या जॉर्ज टर्नबुल या मुख्य अभियंत्यांनी ही रेल्वे लाइन मार्गे (व्हाया) बांदेल,बरद्वान,राजमहल,आणि पाटणा असी ५४१ कि.मी.रेल्वे लाइन नियोजित केली आणि तयार केली. हा मार्ग गंगाकाठचा सपाट प्रदेश, त्यात कांही टेकड्या समविष्ट आहेत कारण त्यानंतर जुनी रेल्वे इंजिन उपलब्ध होतात. रेल्वे स्थानक गंगा नदीचे पूर्व तीरावर बांधलेले होते.

सन १८७२ मध्ये औद्ध आणि रोहिलखंड रेल्वे कंपनी ने बनारस ते लखनऊ ही रेल्वे लाइन चालू केली.सन १८८७ मध्ये बनारस येथे गंगा नदीवर डुफ्फेरिण ब्रिज बांधला त्यामुळे मुघलसराई पर्यंत ट्रेन ये जा करू लागल्या. सन १९७५-७७ या काळात कमलापती त्रिपाठी रेल्वे मंत्री होते तेव्हा सध्याच्या रेल्वे स्थानकची इमारत बांधलेली आहे. सन १९९८ मध्ये नितीश कुमार रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांनी कँण्टांनमेंट बाजू उपयोगात आणली. सन २००८ मध्ये बाकी भागाचा विकास केला.

येथून् सुरुवात होणाऱ्या एक्सप्रेस गाड्या

[संपादन]

येथे थांबा असणाऱ्या गाड्या

[संपादन]

पायाभूत सुविधा

[संपादन]

वाराणशी कँण्टांनमेंट रेल्वे स्थानक मध्ये ऑटोमेटेड सिग्नलिंग सिस्टम सह आधुनिक रूट इंटर्लॉक सिस्टम सुविधा आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "वाराणसी जंकशन (BSB)".
  2. ^ "वाराणसी रेल्वे स्थानक सेट फॉर ए मेकओव्हर".
  3. ^ "हिस्टरी ऑफ ईस्टर्न रेल्वे".
  4. ^ "वाराणसी जंकशन रेल्वे स्थानक टाईम टेबल".
  5. ^ "इट विल सुन टेक हाफ दी अर्लिअर टाईम टू रिच अलाहाबाद फ्रॉम वाराणसी".