तिरुपती रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिरुपती रेल्वे स्थानक

तिरुपती रेल्वे स्थानक (स्टेशन कोड: टीपीटीई) हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील रेल्वे स्थानक असून , तिरुपती आणि चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरू येथे उतरतात.[१]

इतिहास[संपादन]

१८९१ मध्ये दक्षिण इंडियन रेल्वे कंपनीची मीटर गेज लाइन दक्षिण आरकॉट जिल्ह्यातील विल्लुपुरमपासून सुरू झाली आणि काटपाडी आणि चित्तूर येथून पकालापर्यंत गेली.[२] तिरुपती परिसर असलेल्या काटपाडी-गुडुर मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित केले गेले आहे.[३]

वर्गीकरण[संपादन]

तिरुपती रेल्वे स्थानकावर आलेली पद्मावती एक्सप्रेस

गुंटकल रेल्वे डिव्हीजनमध्ये तिरुपती हे ए-1 श्रेणीचे स्टेशन म्हणून वर्गीकृत आहे.[४] भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च १०० बुकिंग होणाऱ्या स्टेशनपैकी एक हे देखील आहे.[५]

महसूल[संपादन]

खालील तक्ता मागील वर्षातील स्टेशनच्या प्रवासी कमाई दर्शविते.[६]

सुविधा[संपादन]

तिरुपती रेल्वे स्थानकवर ५ फलाट आहेत आणि प्रत्येक फलाटावर २४पेक्षा जास्त डबे असलेली गाडी थांबू शकते. प्रत्येक फलाटावरवर एस्लेटलेटर्स उपलब्ध आहेत. या स्थानकावर रोज ४५ प्रवासी गाड्या थांबतात.

वर्ष कमाई ( लाख मध्ये )
2011-12 15536.77
2012-13 16 9 73.58
2013-14 19787.68
2014-15 23226.4

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Station Code Index" (PDF).
  2. ^ "Origin and Development of Southern Railway" (PDF).
  3. ^ "Katpadi Jn. - Pakala Jn".
  4. ^ "Category of Stations over Guntakal Division".
  5. ^ "Tirupati Train Station Time Table".
  6. ^ "Tirupati Station Details".