Jump to content

जयपूर जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयपूर
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता जयपूर, जयपूर जिल्हा, राजस्थान
गुणक 26°55′15″N 75°47′12″E / 26.92083°N 75.78667°E / 26.92083; 75.78667
समुद्रसपाटीपासूनची उंची ४२८ मी
मार्ग दिल्ली-जयपूर
जयपूर-अहमदाबाद
जयपूर-सवाई माधोपूर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७५
विद्युतीकरण नाही
संकेत JP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर पश्चिम रेल्वे
स्थान
जयपूर is located in राजस्थान
जयपूर
जयपूर
राजस्थानमधील स्थान

जयपूर जंक्शन हे राजस्थानच्या जयपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकउत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. सध्या जयपूर राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नव्याने चालू करण्यात आलेल्या जयपूर मेट्रोची गुलाबी मार्गिका जयपूर रेल्वे स्थानकाजवळून धावते. भारत देशाचे राजस्थान राज्यातील जयपुर शहरात हसणपुरा येथे हे भारतीय रेल्वेचे जयपुर जंक्शन रेल्वे स्थानक आहे. हे सन 1875 साली सुरू झाले. येथे 7 प्लॅटफॉर्म आहेत. येथे वाहन तळं आहे. याचा रेल्वे कोड JP आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर पच्छीम विभागाचे मुख्यालय येथे आहे.[] सन 2002 या वर्षा पासून येथूनच भारतीय रेल्वेच्या उत्तर पच्छीम विभागाचे सर्व कामकाज चालते.

आढावा

[संपादन]

हे रेल्वे स्थानक मुख्यालय रेल्वेचे बाजूलाच आहे. राज्य स्तरीय सिंधी कॅम्प बस स्थानक ही या रेल्वे स्थानकचे नजीक आहे. हे स्टेशन सर्व देशभरातील ठिकाणांना मीटर गेज आणि ब्राड गेज लाइनने जोडलेले आहे. या स्टेशनमध्ये दररोज 88 ब्राड गेज आणि 22 मीटर गेज ट्रेन ये जा करतात आणि साधारण 35000 प्रवाशी त्याचा लाभ घेतात. राजस्थान मधील हे अतिशय रहदारीचे रेल्वे स्थानक आहे. येथून राजस्थान राज्यातील अजमेर,जोधपूर,उदयपुर,इ. महत्त्वाच्या शहराकडे ब्राड गेज वरुण धावणाऱ्या थेट (डायरेक्ट) ट्रेन आहेत. भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई, इंदौर, चंडीगढ, एरणाकुलम, हैदराबाद, बंगलोर, पुणे, गुवाहाटी, भोपाळ, अलवार, जबलपूर, नागपूर, लखनऊ, कानपुर, वाराणसी, पटना, विसाखापट्टणम, ही मुख्य ठिकाने ब्राड गेज ट्रेनने जोडलेली आहेत. सीकर व चुरु ही ठिकाणे मीटर गेज ट्रेनने जोडलेली आहेत.[]

भारत देशाच्या द पॅलेस ऑन व्हील्स या अतिशय प्रशिद्द व आरामदाई असणाऱ्या ट्रेनला देखील येथे ठरलेल्या वेळेला थांबा दिलेला आहे.[] सिटी वाल ऑफ जयपुर पासून हे स्टेशन 5 किमी अंतरावर आहे. अलीकडेच जयपुर मेट्रो स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचा थांबा येथेच आहे.

भारत देशातील सर्व महत्त्वाची शहरे जयपुर शहराला रेल्वे मार्गाने जोडलेली आहेत. ती खालील प्रमाणे आहेत.

शहर तपशील
दिल्ली दररोज 13
आग्रा व मथुरा 11
अहमदाबाद 8
कानपुर 6
रोहटक, भिवानी, मुंबई, भोपाळं, सूरत, अलाहाबाद, वाराणसी 4
वडोदरा 3
लखनऊ 3
चंदिगढ,हिसार,अंबाला वीकली 19
इंदोर,बरेली,नागपूर,पाटणा दररोज 2
जालंधार, लुधीयाणा, देहरादून विकली 11
बिलासपुर 9
जम्मू व रायपुर 8
खजुराव, राजकोट, गोरखपूर, जबलपूर, ग्वालियर, दररोज
अमृतसर, विजयवाडा, चेन्नई वीकली 5
पोरबंदर वीकली 4
गुवाहाटी, पुणे, बंगलोर, हैदराबाद वीकली 3
संबलपुर, भुवनेश्वर पुरी, मैसूर वीकली 2
रांची, गोवा, मंगलोर, एरणाकुलम, कोइंबतूर, विशाखापट्टणम वीकली

राजस्थान राज्यातील सर्व मुख्य आणि महत्त्वाच्या ठिकाणांना तसेच सामान्य स्टेशनाना प्रत्येक दिवशी रेल्वे सेवा देऊन जयपुर शहर जोडलेले आहे.[] त्यात जयपूरहून प्रत्येक दिवशी अजमेर साठी 22 ट्रेन, अलवर साठी 20 ट्रेन, जोधपूर साठी 12 ट्रेन, कोटा व अबु रोड साठी 10 ट्रेन, सीकर साठी 7 ट्रेन, बीकानेर आणि भिलवाडा साठी 5 ट्रेन, उदयपूर साठी 4 ट्रेन आहेत.

प्रमुख रेल्वेगाड्या

[संपादन]

मुख्य रेल्वे लाइन्स

[संपादन]

जयपुरहून खालील मुख्य रेल्वे लाइन निघालेल्या आहेत.

  • दिल्ली – जोधपूर मार्गे मक्राणा, डेगणा,मेरटा रोड, (एक पदरी ब्रोड गेज डीजल लाइन)
  • दिल्ली – अहंमदाबाद मार्गे अजमेर (डीजल ब्रोड गेज लाइन)
  • सवाई माधोपुर – जयपुर लाइन , (एक पदरी ब्रोड गेज डीजल लाइन)
  • जयपुर – चुरु (मीटर गेज) []

जवळची रेल्वे स्थानके

[संपादन]

गांधीनगर जयपुर रेल्वे स्थानक,गातोर जगतपुरा रेल्वे स्थानक,दुर्गापुरा रेल्वे स्थानक,दहर का बालाजी रेल्वे स्थानक,बैस गोदाम रेल्वे स्थानक,कनकपुरा रेल्वे स्थानक.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अबाउट ऑफ़ नार्थ वेस्टर्न रेल्वे".
  2. ^ "जयपूर-चुरु (वाया सीकार) रूट टू क्लोज फॉर गौज कॉन्व्हर्जन".
  3. ^ "पॅलेस ऑन व्हील्स ट्रेन - जनरल इन्फॉर्मशन".
  4. ^ "जयपुर ट्रेन स्टेशन टाईम टेबल".
  5. ^ "जयपुर – चुरु रेल्वे इन्क्वायरी".

बाह्य दुवे

[संपादन]