Jump to content

जयसिद्धेश्वर स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयसिद्धेश्वर स्वामी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
मागील शरद बनसोडे
मतदारसंघ सोलापूर

राजकीय पक्ष भाजप

डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (जन्म : १ जून १९५५) हे लिंगायत समाजाचे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानाचे संस्थापक व मठाधिष्ठित धर्मगुरू आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या सोलापूर मतदारसंघातून निवडून गेले.[१] त्यांनी ह्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे, व प्रकाश आंबेडकर यांना हरवले.

जयसिद्धेश्वरस्वामी हे एम.ए. पीएच.डी आहेत.

स्वामींनी स्थापन केलेल्या संस्था

[संपादन]
  • अक्कलकोट येथे बी.बी.ए. (Bachelor of Business Administration) व बी.सी.ए. (Bachelor in Computer Application) महाविद्यालय
  • गुरूसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र
  • गौडगाव येथे मागासवर्गीय वसतिगृह
  • गौडगाव येथे सांस्कृतिक केंद्र
  • जगद्गुरूपंचाचार्य प्रशाला
  • नूतन प्राथमिक मराठी शाळा
  • यतेश्वर पब्लिक स्कूल
  • शेळगी सोलापूर येथे शिवयोगीधाम हे आध्यात्मिक केंद्र

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "GENERAL ELECTION TO LOK SABHA TRENDS & RESULT 2019". भारतीय निवडणूक कमिशन.