Jump to content

नितीन गडकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नितीन गडकरी
जन्म २७ मे,१९५७
नागपूर
निवासस्थान महाल, नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे पूलकरी, रोडकरी
नागरिकत्व भारतीय
शिक्षण दादासाहेब धनवटे नगर विद्यालय, जी.एस.कॉमर्स कॉलेज
पेशा उद्योजक, राजकारणी
मूळ गाव धापेवाडा
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
धर्म हिंदू
जोडीदार सौ.कांचन
अपत्ये ३ (निखील,सारंग, कु.केतकी)
वडील जयराम गडकरी
आई भानूताई गडकरी
संकेतस्थळ
http://www.nitingadkari.org/

नितीन जयराम गडकरी (मे २७, इ.स. १९५७ - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या १६व्या लोकसभेत ते खासदार म्हणून नागपूर लोकसभा मतदार संघातून २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना एकूण ५,८७,७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३,०२,९३९ मते मिळाली.[१]

ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. २६ मे २०१४ला मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि. २९ मे २०१४ रोजी स्वीकारला.

यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले.

  • मध्य प्रदेशातील कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

भूषविलेली पदे

[संपादन]
नितीन गडकरी भावमुद्रा
  • माजी मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र शासन) व पालकमंत्री, नागपूर, महाराष्ट्र.(कार्यकाळ: २७ मे १९९५ ते १९९९)[२]
  • चेअरमन, पुर्ती उद्योग समूह[२]
  • विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद[२]
  • सदस्य (आमदार), महाराष्ट्र विधान परिषद, (पदवीधर मतदारसंघ) महाराष्ट्र. (वर्ष-१९८९, १९९०, १९९६ व बिनविरोध-२००२)[२]
  • माजी सदस्य, हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन, महाराष्ट्र शासन.[२]
  • माजी-अध्यक्ष, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ[२]
  • अध्यक्ष, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,[२]
  • प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्र प्रदेश.[३]
  • राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी,[४]

इतर महत्त्वाची माहिती

[संपादन]

ते एक शेतकरीही आहेत.तसेच उद्योजकही आहेत.[२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "'लोकसभा निवडणूक २०१४ महाराष्ट्रातील विजयी उमेदवार'". pp. पान क्र. २. २५ मे २०१४ रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)[permanent dead link]
  2. 1 2 3 4 5 6 7 8 "Nitin Gadkari &#124". Nagpurpulse.com. 2012-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-07-11 रोजी पाहिले.(इंग्रजी मजकूर)
  3. ↑ "बायोग्राफि ऑफ नितीन गडकरी". Silobreaker. 2012-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-07-11 रोजी पाहिले.(इंग्रजी मजकूर)
  4. ↑ एकॉनॉमिक टाइम्स.कॉम "फिचर्स" Check |दुवा= value (सहाय्य). द टाइम्स ऑफ इंडिया. 2009-12-20.(इंग्रजी मजकूर)