चर्चा:रंगनाथस्वामी निगडीकर
पानकाढा
[संपादन]{{पानकाढा }}
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:५२, १४ डिसेंबर २०११ (UTC)
- लेखात भर टाकला त्यामुळे पान काढा साचा काढला आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:४०, ३ मे २०१८ (IST)
इतरत्र सापडलेला मजकूर
[संपादन]इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा.
रंगनाथ स्वामी निगडीकर हे समर्थ विरचित दास पंचायतपैकी एक समर्थसंत आहेत. १) श्री रामदास स्वामी ( सज्जनगड ) २) श्री जयरामस्वामी (वाडगाव) ३) श्री रंगनाथ स्वामी (निगडी ) ४) आनंदमूर्ती (ब्रह्यनाळ ) ५) श्री केशवस्वामी (भागानगर, हेद्राबाद ) असे समर्थ व शिवकालीन दास पंचायतन आहे.श्री रंगनाथ स्वामी यांचा जन्म रविवार मिती मार्गशीर्ष शु // १० // शके १५३४ नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे झाला. श्री. बोपाजीपंत देशपांडे व सौ. बयाबाई यांना तीन अपत्ये झाली त्यापैकी नंबर दोनचे चिरंजीव श्री रंगनाथ स्वामी होत नंबर चिरंजीव विठ्ठलस्वामी हे निगडी येथे आले त्यांचा गोसावी मंडळी हे वंशज आहेत.लहानपणी वयाच्या बाराव्यावर्षी मुंज झाल्याबरोबर स्वामींनी हिमालयात पलायन केले. तेथे त्यांनी (बद्रीधाम) मानाबॅर्डर येथे व्यास गुंफेमध्ये राहून ध्यानधारणा व आध्यत्मज्ञान मिळविले. सतत बारा वर्षे तपश्चर्या केलेनंतर त्यांना व्याघ्रूपामध्ये श्री. गुरुदत्तार्तय यांनी दर्शन दिले, व समाजसेवा करण्याची आज्ञादिली व राजयोगाचा वर दिला.महाराज दक्षिण भारताकडे प्रवासास निघाले असताना हिमाचल प्रदेशातील तिहरी संस्थानिकांनी त्यांना राजयोगाचा भाग म्हणून भरजरी वस्त्रे, महावस्र्ते, आभूषणे, भाला, तलवार व मनोहर नावाचा तेजस्वी घोडा प्रदान केला. त्यावेळेपासून महाराज घोडयावरून प्रवास करीत असत. मनोहर घोडा ज्यावेळी महाराजांची आज्ञा मानणार नाही तो परिसर आपले कार्यक्षेत्र करावे असा दृष्टांत महाराजांना झाला. येणेप्रमाणे हा घोडा निर्गुणपूर म्हणजे निगडी येथे आल्यावर तेथे मनोहर घोडा आज्ञा मानेना. त्याचे खुर एका विशाल शिळेमध्ये रुतले. ही आज्ञा समजून महाराजांनी निगडी ही कर्मभूमी निवडली, ही विशाल शिळा आजही पहावयास मिळते. त्याचे स्मारक केलेले आहे.निगडी येथे वास्तव्य करून महाराजांनी त्यावेळचे दास पंचायतन मध्ये प्रवेश केला व शिवाजी महाराजांचे धर्मकार्यास वाहून घेतले.श्री रंगनाथ स्वामी हे उत्तम कीर्तनकार असल्यामुळे त्या माध्यमातून ते धर्मकार्य, लोकजागृती करून देशसेवा, समाजसेवा करीत होते. त्यांचे उत्तरदायित्व म्हणून आजही निगडीकर मंडळी अनेक ठिकाणी कीर्तन, प्रवचन, भजन करून समाज प्रभोधनाचे कार्य करतात.