Jump to content

जयरामस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयरामस्वामी वडगावकर (१५९९–१६७३) हे सातारा जिल्ह्यातील वडगावच्या गादीचे अधिपती. ह्या गादीचे संस्थापक शांतलिंगाप्पा ऊर्फ शांतेश्वर महाराज ह्यांचे शिष्य कृष्णाप्पास्वामी हे जयरामस्वामींचे गुरू. जयरामस्वामी हे कात्राबाज मांडवगणचे देशपांडे असून त्यांचे उपनाव कसरे असे होते. सीतास्वयंवर (१६४८), रुक्मिणीहरण (१६५४) आणि अपरोक्षानुभव (१६६९) हे त्यांचे काही ग्रंथ. ह्यांच्या चरित्राची एक बखरही उपलब्ध आहे.[]

समर्थ पंचायतनात समर्थ रामदासस्वामी, जयरामस्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी निगडीकर, आनंदमूर्ती, आणि केशवस्वामी यांचा समावेश होतो. याबद्दलचा एक श्लोक असा आहे :-

श्रीरामदास जयराम रंगनाथ। आनंदमूर्ति केशव सनाथ।। ऐसे हे पंचायतन समर्थ। रामदासस्वामींचे॥१॥
हे दिसताती वेगळाले।[] परी ते स्वरूपी मिळाले॥। अवघे मिळोनि येकच जाले। निर्विकारवस्तु॥२॥
  1. ^ "समर्थ पंचायतन". 2022-04-09 रोजी पाहिले.
  2. ^ "समर्थ पंचायतन". विकिपीडिया. 2016-07-20.