मोहरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोहर्रम या पानावरून पुनर्निर्देशित)
मोहरमच्या वेळचे हैद्राबादमधील १८९० मधील दृष्य

मोहरम (इंग्लिश-Muharram, अरेबिक: المحرّم) किंवा मुह्हरम हा एक मुस्लिम सण आहे. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम याचा अर्थ "निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा" असा आहे.

इतिहास[संपादन]

पैगंबर म्हणजे इस्लामचा 'पैगाम 'म्हणजे संदेश माणसापर्यंत पोचवणारा. पैगंबराने हा धर्म निर्माण केला. त्याला या धर्माचा 'इलहाम' झाला. त्याला जेव्हा याचा 'इलहाम' झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्याला आपण काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली नव्हती. त्या दिवसापासून याला, "सल्लील्लाहू अलेह वसल्लम हजरत पैगंबर नबी" असे म्हणू लागले. सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता. हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन याच्या वधाची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला. हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी म्हणजे सुन्नी पंथाच्या खलीफांनी इ.स. च्या सातव्या शतकात करबला मैदानात "दर्दनाक मौतीचा" अविष्कार करत ठार मारले.हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात. हुसेनचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेनच्या नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळतात. हा प्रकार अरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात. कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी एका दांडक्याला 'पंजा' लावून चांगले वस्त्र बांधतात.

मोहरमवेळी शोक करताना

कडेगांव येथील ताबुतांची मिरवणूक[संपादन]

सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथे सुरु आहे. मोहरम निमित्त या गावी २५० फूट उंचीचे बांबू पासून (कळक) ताबूत बनवले जातात. अष्टकोनी आकाराचे व पहिल्यांदा कळस आणि मग पाया या पद्धतीने हे ताबूत उभारले जातात व त्याची मिरवणूक काढली जाते.

संदर्भ[संपादन]

एबीपी माझा वरील वत्त

बाह्यदुवे[संपादन]