भारतमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतमाला (इं:Bharatmala) हे नाव मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी रस्ते व महामार्ग प्रकल्पाला दिलेले नाव आहे.[१] हा प्रकल्प गुजरातराजस्थानपासून सुरू होऊन पंजाब कडे जाईल व नंतर संपूर्ण हिमालयातील राज्यांना आवाक्यात घेईल- जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेशउत्तराखंड, त्यानंतर, उत्तर प्रदेशबिहार या राज्यांच्या सीमांपैकी काही भाग व्यापून मग तो सिक्किमआसामअरुणाचल प्रदेशकडे वळेल, त्यानंतर तो थेट भारत-म्यानमार सीमारेषेजवळच्या मणिपूरमिझोराम पर्यंत जाईल.[१]

अर्थव्यवस्था[संपादन]

या प्रकल्पात जवळपास  ५०० billion (US$११.१ अब्ज) इतकी गुंतवणूक अपेक्षित आहे.[२]

प्रगती[संपादन]

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २.६ लाख करोड रुपयांच्या खर्चाचा समावेश असलेली एक मसूदा कॅबिनेट नोट भारतमाला प्रकल्पावर बनविली आहे, ज्यात सुमारे २५,००० किमी रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचापण अंतर्भाव आहे.तसेच, १०० जिल्हा मुख्यालयांचापण यात समावेश आहे.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b इंग्रजी मजकूर भारतमाला: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात ते मिझोराम पर्यंत रु. १४,००० करोड ची योजना बनविली Check |दुवा= value (सहाय्य). एकॉनॉमिक टाईम्स. नवी दिल्ली.
  2. ^ इंग्रजी मजकूर सरकारने भारतमाला योजना बनविली, ५००० किमी रस्त्यांचे जाळे Check |दुवा= value (सहाय्य). टाईम्स ऑफ इंडिया. नवी दिल्ली.
  3. ^ इंग्रजी मजकूर भारतमाला प्रकल्पांतर्गत २५,००० किमी रस्त्यांचे जाळे मंत्रालयाद्वारे प्रस्तावित Check |दुवा= value (सहाय्य). एकॉनॉमिक टाईम्स. नवी दिल्ली.