प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (इं:Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana, लघुरुप: (PMKSY))हे एक राष्ट्रीय ध्येय आहे. याचा उद्देश शेतकी उत्पादन वाढविणे व देशातील विविध स्रोतांचा वापर होतो आहे याची खात्री करणे असा आहे.येत्या ५ वर्षात याची अंदाजपत्रकीय तरतूद रु. ५०,००० करोड इतकी आहे.[१] याबाबतचा निर्णय दि. १ जुलै २०१५ ला कॅबिनेट कमेटीच्या बैठकीत घेण्यात आला.याचे प्रमुख नरेंद्र मोदी होते.

उद्देश[संपादन]

या योजनेचा प्राथमिक उद्देश हा, क्षेत्रिय स्तरावर पाटबंधारे प्रणालीत गुंतवणूक आकर्षित करणे, विकास करणे व देशात उपजाऊ जमिनीचे क्षेत्र वाढविणे असा आहे.पाण्याचा वापर योग्य तऱ्हेने करणे जेणेकरुन त्याचा अपव्यय होणार नाही.पाणी बचतीचे विविध मार्ग अवलंबून व नेमके पाटबंधारीकरण वापरुन 'एका थेंबाद्वारे पिक वाढवा' असा याचा उद्देश आहे.पाण्याशी संबंधित सर्व विभाग व पाण्याची पुनर्चक्रीकरण पद्धत वापरणे व जलचक्राचेयोग्य नियोजन करणे याची तरतूद केल्या गेली आहे.[२]

संदर्भ[संपादन]