प्रधानमंत्री मुद्रा योजना
नरेंद्र मोदी हा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या लेखमालिकेतील एक भाग आहे |
वैश्विक योगदाने
|
प्रधानमंत्री मुद्रा योजना (इं:Pradhan Mantri Mudra Yojana लघ्रुप:(PMMY))२०१५ -१६ च्या अर्थसंकल्पानुसार २०००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून मुद्रा बँक उभारण्याची घोषणा करण्यात आली , बँकेअंतर्गत ३००० कोटी रुपयांचा पतहमी निधी उभारण्याची घोषणा करण्यात आली . मुद्रा बँकेची कंपनी म्हणून मार्च २०१५ मध्ये कंपनी कायदा २०१३ अंतर्गत आणि गैरबँकिंग वित्तीय कंपनी म्हणून ७ एप्रिल २०१५ ला रिझर्व्ह बँक कायदा १९३४ अंतर्गत नोंदणी करण्यात आली मुद्रा ही एक सुक्ष्म एककांच्या विकास व पुनर्वित्तपुरवठ्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली नविन संस्था आहे.या योजनेची घोषणा, २०१६च्या केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये अर्थमंत्र्यांनी केली. या मुद्रा योजनेचा उद्देश नॉन-कॉर्पोरेट[मराठी शब्द सुचवा] लघु व्यावसायिक क्षेत्रास वित्त पुरवठा करणे असा आहे.[१] प्रधानमंत्री मुद्रा योजनेत रु. एक लाख करोड पर्यंत छोट्या व्यावसायिकांना कर्ज मंजूर करण्यात आले असे प्रधानमंत्री म्हणाले.त्यांनी यावर जोर दिला कि तरुणांनी रोजगार देण्याची तयारी ठेवावयास हवी न कि रोजगार मागण्याची. [२]
उद्देश[संपादन]
या योजनेअंतर्गत तीन वर्ग तयार करण्यात आले आहेत:
- शिशू :-
५०,००० (US$१,११०) पर्यंत कर्ज
- किशोर :-
५०,००० (US$१,११०) ते
5 लाख (US$११,१००) पर्यंत कर्ज
- तरुण :-
5 लाख (US$११,१००) च्या वर पण,
10 लाख (US$२२,२००) पेक्षा खाली, पर्यंत कर्ज
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ[संपादन]
- ^ "पंतप्रधानांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे विमोचन केले". Gov.in. 4 September 2015 रोजी पाहिले.
- ^ "रु. १ लाख करोड मुद्रा योजनेअंतर्घत कर्ज दिल्या गेले:प्रधानमंत्री मोदी". Vasopedia.com. 2 February 2016 रोजी पाहिले.