मृदा आरोग्य कार्ड योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मृदा आरोग्य कार्ड योजनाही भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु केलेली एक योजना आहे.[१]या योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी करण्याची योजना आखली आहे.यामध्ये पीकांनुसार शिफारसी, आवश्यक पोषक तत्त्वे व त्या शेतीनुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिल्याजाईल. जेणेकरुन, शेतक्ऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल.सर्व मातींच्या नमून्यांची चाचणी देशभरातील विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेत केल्या जाईल.त्यानंतर तज्ज्ञ हे त्या मातीची ताकत व दुबळेपणा (सुक्ष्म पोषक तत्त्वांचा उणेपणा) तपासतील व अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करतील.या तपासणीचे निकाल व शिफारसी त्या कार्डमध्ये नोंदविल्या जातील.सुमारे १४ करोड शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड वितरीत करण्याचा सरकारचा मानस आहे.[२]


योजना[संपादन]

या योजनेचे ध्येय शेतकऱ्यांना चाचणी केलेल्या मातीनुसार खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे असा आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळू शकेल.

अंदाजपत्रकीय तरतूद[संपादन]

या योजनेसाठी सरकारने चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास व आरोग्य कार्ड जारी करण्यास Indian Rupee symbol.svg१०० करोड (US$२२.२ मिलियन) रुपयांची तरतूद केली आहे.[१][२]

संदर्भ[संपादन]