प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना(इं:Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) ही एक भारतातील सरकारद्वारे पुरस्कृत अपघात विमा योजना आहे. याचा मूळ उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारताच्या २०१५ च्या अंदाजपत्रकात, फेब्रुवारी २०१५ मध्ये केला होता.[१] याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेद्वारे कोलकाता येथे ९ मेला झाले.[२] मे २०१५ ला, भारताच्या फक्त २०% लोकांपाशीच कोणत्याना कोणत्या प्रकारचा विमा आहे.या योजनेचे ध्येय हा आकडा वाढवावयाचे आहे.

वैशिष्ट्ये

१) लक्ष्यगट - अपघात विमा न नोंदवलेले सर्व नागरिक

२) वय व पात्रता - १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात , लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे जरुरीचे आहे .

३) हप्ता-  योजनेसाठी वार्षिक १२ रु + (सेवाकर )हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल , हप्त्यासाठी आर्थिक वर्षे  १ जून ते ३ मे असेल .

४) विमा लाभ - लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु . अर्थसाहाय्य मिळेल , लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रु व आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रु अर्थसाहाय्य दिले जाते .

५) व्यवस्थापन - योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो

संदर्भ[संपादन]

  1. ^ [[१] "जन सुरक्षा:लोकांसाठी सामाजिक सुरक्षा,विमाकर्त्यासाठी दर अत्यल्प"] Check |url= value (सहाय्य), बिझिनेस स्टॅंडर्ड, ९ मे २०१५
  2. ^ [[२] "बँका प्रधानमंत्री विमा योजनेची जाहिरात करतात"] Check |url= value (सहाय्य), Live Mint, ८ मे २०१५