प्रधानमंत्री जन धन योजना
![]() ![]() हा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या लेखमालिकेतील एक भाग आहे |
वैश्विक योगदाने
|
प्रधानमंत्री जन धन योजना(इं:Pradhan Mantri Jan-Dhan Yojana लघुरुप:PMJDY)(हिंदी:प्रधानमंत्री जन धन योजना),ही भारताची एक आर्थिक क्षेत्राची वित्तीय समावेशन योजना आहे ज्याद्वारे,बँक बचत व जमा खाते,प्रदान, जमा करणे विमा व पेन्शन या आर्थिक सेवा एकाच परवडणाऱ्या रितीने हाताळता येतात.याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे २८ ऑगस्ट २०१४ला करण्यात आले.[१] त्यांनी या योजनेची घोषणा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम भाषणात दि. १५/०८/२०१४ला केली होती.
आर्थिक मंत्रालयाद्वारे चालित या योजनेत उद्घाटनाच्याच दिवशी १.५ करोड खाती उघडण्यात आलीत.[२][३] गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने याची नोंद घेतली. त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात ते म्हणतात:
एकाच आठवड्यात म्हणजे २३ ते २९ ऑगस्ट २०१४ या दरम्यान,भारतीय बॅकांद्वारे सुमारे १,८०,९६,१३० इतकी खाती उघडण्यात आलीत.जून २०१६ पर्यंत हा आकडा २२० लाख ईतका पोचला व याद्वारे रु. ३८४.११ लाख इतके या योजनेत जमा करण्यात आलेत..
जन धन योजना आधारस्तंभ:-
जन धन योजनेअंर्तगत सहा आधारस्तंभ निवडण्यात आले असून या सहा विषयांमध्ये व्यापक वित्तीय समावेशन करायचे आहे सहा विषय दोन टप्प्यामध्ये विभागले आहेत
पहिला टप्पा -( १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत )
१) बँकिंग सुविधापर्यॅंत वैश्विक पोहोच
२) ६ महिन्यापर्यंत ५,०००रुपयापर्यंतची अधिकर्ष सुविधा देणारे, १ लाख रुपयांच्या अपघाती विम्याची सुविधा असणारे रूपे कार्ड देणारे ,
रूपे किसान कार्ड देणारे ' बँकखाते '
३) ' वित्तीय साक्षरता कार्यक्रम '
दुसरा टप्पा ( १५ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१८)
४) ओव्हरड्राफ्ट खात्यामधील बुडालेल्या कर्जासाठी 'पतहमी निधीची उभारणी
५) सूक्ष्म विमा
६) असंघटीत क्षेत्रासाठी स्वालंबनसारख्या 'पेन्शन योजना '
जन धन योजनेअंतर्गत बँकांमध्ये खाती उघडल्यास खालील सुविधा मिळतात
१) झिरो बॅलन्स खाते उघडता येते , सोबत रूपे डेबिट कार्ड मिळते व १ लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरविला जातो.
२) २६ जानेवारी २०१५ आधी खाते उघडणऱ्यांचा ३० हजार रुपयांचा जीवन विमाही उतरविला गेला .
३) खाते उघडल्यानंतर ६ महिन्यांनी खातेदारला ५,०००रु. पर्यंतचे अधिकर्ष कर्ज मिळू शकते .
४) योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या अटी रिझर्व्ह बँकेने काहीशा शिथिल केल्या आहेत. त्यामुळे ओळखपत्रासाठी अगदी गावातील सरपंचाचे शिफारसपत्रसुद्धा ग्राह्य धरले जाते .
या योजनेमुळे खालील सकारत्मक बदल होणार आहेत
१) वित्तीय साक्षरता वाढून संघटीत वित्तसंस्थाकडून होणारा पतपुरवठा वाढणार आहे
२) ग्रामीण भागातील वित्तीय समावेशनाला गती लाभणार आहे
३) वित्तीय अस्पृश्यता कमी होणार आहे .
४) सूक्ष्म विमा सेवांचा पाया विस्तृत होणार आहे ,
५) आगामी काळातील नियोजित थेट लाभ हस्तांतरण योजनासाठीचा पाया जलद गतीने उभारला जात आहे .
संदर्भ[संपादन]
- ^ Prime Minister to Launch Pradhan Mantri Jan Dhan Yojana Tomorrow, Press Information Bureau, Govt. of India, 27 August 2014
- ^ ET Bureau (28 August 2014), PM 'Jan Dhan' Yojana launched; aims to open 1.5 crore bank accounts on first day, The Economic Times
- ^ "Modi: Banking for all to end "financial untouchability"". Reuters. 28 August 2014. Archived from the original on 2015-09-19. 2016-10-09 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |