आंतरराष्ट्रीय योग दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंतरराष्ट्रीय योग दिवस या पानावरून पुनर्निर्देशित)

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे.[१]


पार्श्वभूमी[संपादन]

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

सांस्कृतिक महत्त्व[संपादन]

भारतीय धर्म संस्कृतीमधील "योग" संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.[२] त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे.[३] जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते.

योग चळवळ[संपादन]

दोन वर्षांत या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. १८ जून रोजी ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले.स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली.[४]

सूर्यनमस्कार

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "२१ जून आता 'जागतिक योग दिन'". लोकसत्ता. २१ डिसेंबर २०१४. २० जून २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ Easwaran, Eknath (2007). The Bhagavad Gita: (Classics of Indian Spirituality) (इंग्रजी भाषेत). Nilgiri Press. ISBN 9781586380199.
  3. ^ Miller, Barbara Stoler (2009-10-07). Yoga: Discipline of Freedom: The Yoga Sutra Attributed to Patanjali (इंग्रजी भाषेत). Random House Publishing Group. ISBN 9780307571687.
  4. ^ "ऑस्ट्रेलियन संसदेत योग दिवस साजरा". पुढारी. १८ जून २०१८. Archived from the original on 2018-06-23. २० जून २०१८ रोजी पाहिले.