स्टॅचू ऑफ युनिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एकतेचा पुतळा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
स्टॅच्यू ऑफ युनिटी

स्टॅच्यू ऑफ युनिटी (मराठी: एकतेचा पुतळा) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्मारक आहे, हे गुजरातच्या राजपीपळा शहरा जवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर स्थित आहे. हे स्मारक २०,००० मी क्षेत्रात आहे आणि १२ किमी आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीची ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे.[१]

ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन अँड टुब्रो यांच्याशी केला गेला. याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण झाले.

भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केले होते[२] आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Sharma, Ashwani (2014-12-29). "14 Things You Did Not Know About Sardar Patel, The Man Who United India". TopYaps (en-US मजकूर). 2018-10-31 रोजी पाहिले. 
  2. ^ "स्टॅच्यू ऑफ युनिटी : मराठी माणसानं घडवला सरदार पटेलांचा पुतळा". BBC News मराठी (mr मजकूर). 19-11-2018 रोजी पाहिले. "गुजरातमध्ये साकारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. हा जगातला आतापर्यंतचा सर्वांत उंच पुतळा आहे. या पुतळ्याचे शिल्पकार महाराष्ट्रातले राम सुतार हे आहेत." 
  3. ^ "Ekta Yatra". Statue of Unity (en-US मजकूर). 2018-10-31 रोजी पाहिले.