भारतातील उच्च-गती रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सध्या भारतात उच्च-गती रेल्वे (२०० किमी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त गती असलेली) नाही.[१]

२०१४ च्या निवडणूकांपूर्वी, दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी उच्च-गती रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसने भारतातील एक लक्ष लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांना उच्च-गती रेल्वेने जोडण्याचे वचन दिले.[२] जेंव्हा , भाजपाने ही निवडणूक जिंकली तर हिरक चतुष्कोन प्रकल्पाचे आश्वासन दिले. त्याद्वारे चेन्नई,दिल्ली,कोलकातामुंबई ही शहरे जोडली जातील.[३] नविन सरकारसाठी हा प्रकल्प प्राथमिकतेवर ठेवण्यात आला.[४] उच्च गती रेल्वेमार्गाच्या एक किमी बांधकामास सुमारे १०० ते १४० कोटी ईतका खर्च येतो जो सामान्य रेल्वे मार्गाच्या सुमारे १० ते १४ पट आहे.[५]

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उच्च-गती रेल्वेमार्ग बांधण्यास जपानची निवड केली. नियोजित रेल्वे ही महाराष्ट्रच्या मुंबई या राजधानीच्या शहरापासून अहमदाबाद या पश्चिमेस असलेल्या शहरापर्यंत धावेल. याची गती सुमारे ३२० किमी प्रति तास इतकी राहील व अंतर सुमारे ५०० किमी इतके.[६][७] जपानच्या प्रस्तावानुसार, याचे बांधकाम २०१७ मध्ये सुरू होऊन ते २०२३ मध्ये संपेल.यास सुमारे Indian Rupee symbol.svg  ९८० billion (US$२१.७६ बिलियन) इतका खर्च येईल. यासाठी जपान कमी व्याजाचे कर्ज देईल.[८]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]