मिशन इंद्रधनुष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मिशन इंद्रधनुष ही मोहीम जे. पी. नड्डा या भारताच्या आरोग्य मंत्र्यांनी २५ डिसेंबर २०१४ रोजी विमोचित केली.[१] या योजनेचा उद्देश २ वर्षांखालील लहानग्यांचा व त्यांच्या मातांचा, सन २०२० पर्यंत, सात प्रकारच्या रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे असा आहे. या रोगांमध्ये खालील रोगांचा अंतर्भाव होतो: घटसर्प (डिप्थेरिया), डांग्या खोकला (हूपिंग कफ), धनुर्वात (टिटॅनस), पोलिओ, क्षयरोग, देवी व कावीळ-ब (हेपाटायटिस-बी) [२] तसेच काही निवडक राज्यांमध्ये हिमोफेलिया व इन्फ्लुएंझा (प्रकार ब) याही लसी पुरविल्या जातील.[३] [४][५]

संदर्भ[संपादन]