सुकन्या समृद्धी खाते
नरेंद्र मोदी हा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या लेखमालिकेतील एक भाग आहे |
वैश्विक योगदाने
|
सुकन्या समृद्धी योजना किंवा सुकन्या समृद्धी खाते (इं:Sukanya Samriddhi Account) ही भारत सरकारची नवजात कन्यांच्या पालकासाठी राबविल्या जात असलेली एक योजना आहे.या योजनेस भारत सरकारचे पाठबळ आहे.ही योजना नवजात कन्येच्या पालकांना त्या मुलीचे शिक्षणासाठी व लग्नासाठी फंड जमा करण्यासाठी प्रोत्साहन देते.[१]
ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीद्वारे दि. २२ जानेवारी २०१५ला विमोचित केल्या गेली.सध्या या योजनेवर मिळणारे व्याज हे ८.६% (आर्थिक वर्ष २०१६-१७साठी) इतके आहे. या योजनेत करलाभपण आहे. हे खाते कोणत्याही डाक कार्यालयात किंवा कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत उघडल्या जाऊ शकते.[२]सुकन्या समृद्धी योजना भारत सरकार नरेंद्र मोदी यांनी सुरु केली . नरेंद्र मोदी मुलगी वाचावा , मुलगी शिकवा ही घोषणा केली
योजनेची वैशिष्ट्ये
१) या योजनेअंतर्गत १० वर्ष वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत जिवा पोस्ट ऑफिसात 'सुकन्या समृद्धी ' खाते उघडता येते ,यात किमान १०००रु ठेवावे लागतात . एका आर्थिक वर्षात या खात्यात कमाल १.५ लाख रु टाकता येतात ,
२ ) खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास ( जी मुदत आधी असेल ती ) व्याजासह ठेवी परत मिळतात .
३) १८ वर्षे वयानंतर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची मुदत असते उर्वरित रक्कम पुढे केव्हाही ( २१ वर्षे मुदत संपेपर्यंत )काढ़ता येईल
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ[संपादन]
- ^ "Small savings: Girl, uninterrupted". The Financial Express (India). 30 March 2015. 2 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Sukanya Samriddhi to earn at 9.2% interest, PPF 8.7% for FY16". 31 March 2015.