वनवास
Appearance
वनात निवास करणे. वनवास बहुधा स्वेच्छेने घेतला जात नाही. वनवासी आयुष्य व्यतित करताना, झाडाच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रे, ज्याला वल्कले म्हणतात, ती परिधान करावी लागतात. अरण्यात मिळणारी कंद, मुळे यांच्यावर भूक भागवावी लागते. पर्णकुटीत राहावे लागते. दर्भाच्या शय्येवर निजावे लागते.
नित्य जीवनात सहजपणे प्राप्त होणारे सर्व सुखपभोग त्यागून वनवासी आयुष्य व्यतित करणे, हे खडतर तपश्चर्या करण्यासमान असते.
रामायणात कैकेयीने राजा दशरथाकडे मागितलेल्या दोन वरांमुळे रामाला बारा वर्षांचा वनवास भोगावा लागल्याचा उल्लेख आहे.
महाभारतात द्युतक्रिडेमधे हारल्यामुळे पांडवांना बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागल्याचा उल्लेख आहे.