काका विधाते
Appearance
काका विधाते हे ऐतिहासिक विषयांवर कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक आहेत.
विधाते यांनी दुर्योधन ही कादंबरी १९९४ मध्ये लिहिली. २०१३ सालच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये नंतर मिळालेले संदर्भ, काही नवे दुवे यांसह पुनर्लेखन आहे. या आवृत्तीत त्यांनी दोन परिशिष्टे असून यांत महाभारताचा वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे. ही आवृत्ती ४०० पानांनी वाढून १,०४६ पानांची झाली. कादंबरीच्या शेवटी स्थूलमानाने तत्कालीन भारतवर्षाचा नकाशा दिला आहे. पुस्तकाची ४थी आवृत्ती २०१६त निघाली.
कादंबऱ्या
[संपादन]- दर्यादिल : मोगल शाहजादा दारा शिकोह याच्यावरील ऐतिहासिक कादंबरी
- दुर्योधन (१९९४); ४थी आवृत्ती - २०१६
- भार्गव : अखेरचा हिंदू सम्राट हेतू उर्फ हेमचंद्र विक्रमादित्य याच्या वास्तव जीवनाचा वेध घेणारी ऐतिहासिक कादंबरी.
- संताजी: ३री आवृत्ती, १९१६