चर्चा:गोविंदप्रभू
Appearance
तटस्थ भूमिका हवी
[संपादन]य लेखात सध्या "वरील सर्व बाबी लक्षात घेता गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील आद्य समाजप्रबोधनकार होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.", अशी निष्कर्षात्मक आणि सापेक्ष ठरू शकतील, अशी वाक्ये आढळतात. सध्या महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचे आद्यत्व/श्रेय आपल्या जाती-जमातीवर/पंथावर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीवर/श्रद्धास्थानावर खेचून घेण्याचे भरपूर प्रयत्न चालू आहेत; त्यात या लेखातील सापेक्ष व विशिष्ट निष्कर्ष मांडणार्या माहितीची भर पडू नये, याची काळजी घ्यायला हवी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३६, १४ एप्रिल २०११ (UTC)
- महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचा विचार सहसा हिंदू समाजातील कालबाह्य व्हावयास हव्यात अशा रूढींच्या संदर्भाने येतो, या लेखातील ते वाक्य यु.म. पठाणांच आहे त्यांचा मराठी संत साहित्यावरचा अधिकारही नाकारता येत नाही आणि त्यांचा स्वतःचा धर्म हिंदू नसल्यामुळे त्यांच्या तटस्थेबद्दलचे प्रश्नचिन्हही सोपे नाही. तरी सुद्धा प्रत्येकास असे वाक्य असावे असे वाटेल त्या पेक्षा ते वाक्य नसलेले बरे या गोष्टीशी सहमत वाक्य आपण काढू वाक्यप्रयोग काढण्यास माझा विरोध असणार नाही.
सध्या महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचे आद्यत्व/श्रेय आपल्या जाती-जमातीवर/पंथावर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीवर/श्रद्धास्थानावर खेचून घेण्याचे भरपूर प्रयत्न चालू आहेत या वस्तुस्थितीशी सहमत आहे.माहितगार ०६:५५, १५ एप्रिल २०११ (UTC)
संदर्भ पुन्हा का हवेत ?
[संपादन]- अविश्वकोशिय मजकुर वगळण्यास हरकत नाही पण महान्यूज या प्रताधिकारमुक्त संकेतस्थळावरून उतारे घेतले आहेत यूम पठाणांचे शब्द आहेत मग अजून कोणते संदर्भ असने अभिप्रेत आहे ? माहितगार १०:०१, १५ एप्रिल २०११ (UTC)
- या लेखातल्या निष्कर्षात्मक वाक्यांना संदर्भ हवे, असे लिहिले आहे. खेरीज तशी वाक्ये यू.म. पठाणांनी लिहिली आहेत, याला महत्त्व देणे व्यक्तिनिष्ठपणा ठरेल. त्यापेक्षा त्यांनी सदर लेखात गोविंदप्रभूंच्या चरित्रग्रंथासोबत इतिहास-संशोधनाची अन्य काही तौलनिक साधने अभ्यासून त्यांचे संदर्भ नोंदवले असते, तर महान्यूज संस्थळावरील लेखाला स्रोत म्हणून अधिक बळकटी़ आली असती. सध्याचा महान्यूज संस्थळावरील लेख स्रोत म्हणून अभ्यसनीय वाटण्यापेक्षा दिवाळी-अंक/बालभारती/सुटीचे पान/ई-सकाळ-शिदोरी वगैरे छापाचा (= "तेथे कर माझे जुळती" छापाचा :). ही टीका नाही, थोडीशी थट्टेखोरपणे केलेली टिप्पणी आहे .. खेळीमेळीत घ्यावी. :) ) झाला आहे.
- यात "यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण करतात.", "परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता", "त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले", "त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत" ही वाक्ये तटस्थ वाचकाला व्यक्तिपूजक ढंगाची वाटू शकतात... म्हणून अश्या वाक्यांसाठी विश्वासार्ह संदर्भ नोंदवणे आवश्यक वाटते.
- उदाहरणच द्यायचे, तर माझ्या मर्यादित वाचनानुसार रामचंद्र चिंतामण ढेर्यांच्या ग्रंथांमध्ये इतिहास-संशोधनाविषयीची मांडणी स्रोतसंदर्भांचा तौलनिक धांडोळा घेऊन बरीचशी वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडली असते.. तसे या लेखाबाबत जाणवत नाही.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३६, १५ एप्रिल २०११ (UTC)
- पूर्णपणे सहमत आहे. माहितगार १८:५५, १५ एप्रिल २०११ (UTC)