उष्णता प्रारण
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
द्रव्य माध्यमाशिवाय होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला उष्णता प्रारण (इंग्रजी: thermal radiation - थर्मल रेडिएशन) असे म्हणतात. उष्णता प्रारण हे घन, द्रव वा वायू पदार्थापासून, त्यांच्या तापमानामुळे तरंगरूपी ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते. हे उष्णता तरंग विद्युतचुंबकीय तरंगच असतात. मॅक्सवेल यांच्या सिद्धांताप्रमाणे विद्युतचुंबकीय क्षेत्रांचा परिणाम म्हणून तरंग निर्माण होतात; अशा तरंगांच्या प्रसाराची दिशा, विद्युत क्षेत्र व चुंबकीय क्षेत्र एकमेकांशी काटकोन करतात. वास्तविक उष्णता प्रारणाच्या विस्तारात सर्व विद्युत चुंबकीय वर्णपटाचा म्हणजे रेडिओ तरंगांपासून ते अवरक्त किरण, दृश्य प्रकाश, अतिनील किरण, क्ष-किरण व गॅमा किरण (अंत्यंत लहान तरंगलांबीचे विद्युतचुंबकीय तरंग) यांच्यापर्यंतच्या भागांचा समावेश होतो. तथापि पृथ्वीवरील बहुतेक उष्ण पदार्थापासून मिळणारे उष्णता प्रारण बहुशः अवरक्त भागातीलच असते . ताऱ्याचे तापमान त्या मानाने अत्युच्च असल्यामुळे त्यांच्या तापमानानुसार त्यांच्यापासून मिळणाऱ्या प्रारणाच्या वर्णपटाचा विस्तार कमी अधिक असतो. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ देशपांडे, अ. शा. "उष्णता प्रारण". ०९-०१-२०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)