जेम्स क्लार्क मॅक्सवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स क्लार्क मॅक्सवेल (१३ जून, इ.स. १८३१:एडिनबरा, स्कॉटलँड - ५ नोव्हेंबर, इ.स. १८७९:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हा एक प्रसिद्ध स्कॉटिश[१][२] गणितज्ञ व सैद्धांतिक-भौतिकशास्त्रज्ञ होता.[३] त्याचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे वीज, चुंबक आणि इंडक्टन्स ह्यांच्या सिद्धांतांचे एकत्रीकरण. ह्या सिद्धांताना "मॅक्सवेलची समीकरणे" असे टोपणनाव दिले गेले आहे. ह्यात ऍंपअरच्या वीजप्रवाहाच्या नियमामधील एका महत्त्वाच्या बदलाचाही समावेश आहे. आत्तापर्यंतचे सर्वात जास्त व्यापक आणि एकत्रित असे विद्युच्चुंबकीय नियम बनवण्याचे श्रेय मॅक्सवेलकडे जाते.

[मॅक्सवेलचे काम].. न्यूटननंतर झालेले सर्वात सखोल व फलदायक काम आहे.

अल्बर्ट आइनस्टाइन, The Sunday Post[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Early day motion 2048. यु.के. संसद.
  2. जेम्स क्लार्क मॅक्सवेल. द सायन्स म्युझियम, लंडन.
  3. Topology and Scottish mathematical physics. University of St Andrews.
  4. McFall, Patrick "Brainy young James wasn't so daft after all" in The Sunday Post, April 23 2006