आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक २०१४ ही भारताच्याआंध्र प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ७ मे २०१४ रोजी एकाच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेश विधानसभेमधील सर्व १७५ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य वेगळे केल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवली गेली.