कुचिपुडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुचिपुडी ही आंध्र प्रदेश मधील नृत्यशैली आहे.

कुचिपुडी नृृत्य


आंंध्र प्रदेशातील या नृत्यशैलीचा विकास कृष्णदेव आर्य यांच्या काळात इ.स. १५१० ते १५३० या काळात झाला.इ.स. पूर्व दुसर्‍या शतकापूर्वी या कलेचा उगम झाला असून आंध्र प्रदेशातील भागवतार ब्राह्मणांकडून हे नृत्य सांभाळले गेले. वैष्णव भक्तीने ओतप्रोत भरलेला हा नृत्यप्रकार आहे. कुचिपुडी या गावात रामायणातील कथा या गीत,नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर करणारे नट समूह आहेत.त्यांना ' कुशीलव' असे म्हणतात. यामध्ये अधिकतर पुरूष पात्रांचा सहभाग असतो.भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यशैलीचा समन्वयही या नृत्यप्रकारात साधला गेलेला दिसतो.

Kuchipudi Mihira Pathuri.jpg

वैशिष्ट्य[संपादन]

हिंदु धर्म आणि त्यातील पौराणिक कथा यांची परंपरा जतन करून ठेवण्याचे महत्वाचे कार्य या नृत्यशैलीने केले आहे. मंदिरे, राजदरबार यांच्या जोडीनेच सार्वजनिक उत्सवांमधेही हा नृत्यप्रकार सादर होताना दिसतो. हे नृत्य एकल पद्धतीनेही केले जाते.

शैली[संपादन]

"शब्दम्" या प्रकाराची प्रधानता यामधे असते,भरतनाट्यम प्रमाणेच यात तिल्लाना हा प्रकारही सादर होतो. नृत्याच्या शेवटी कलाकार थाळीमध्ये नर्तन करतो. हे नृत्य स्वतंत्र आणि लचकदार पद्धतीने केले जाते.लास्य आणि तांडव या दोन्हीचे मिश्रण यात असते.या पद्धतीला रंगमंच सादरीकरणासाठी आणण्याचे श्रेय सीतेद्र योगी यांना दिले जाते.[१]

Kuchipudi Pooja Reddy.jpg

प्रसिद्ध कलाकार[संपादन]

वेम्पतिचिन्ना सत्यम् , सी.रामाचारियोलु हे या शैलीचे प्रमुख अध्वर्यु मानले जातात.वेदान्तम सत्यनारायण,यामिनी कृष्णमूर्ती, शोभा नायडू,वैजयन्तीमाला, मल्लिका साराभाई, सुधा नायर हे या नृत्यशैलीचे प्रसिद्ध कलाकार आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. डाॅॅ.गर्ग लक्ष्मीनारायण, संंगीत विशारद ( ग्रंंथ) १९९४


कुचिपुडी
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: