समस्थानिके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(समस्थानिक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणाऱ्या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (अन्य मराठी नावे: समस्थानीय[१]; इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम H-1 (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन), ड्यूटेरियम H-2 (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) आणि ट्रिशियम H-3 (१ प्रोटॉन, २ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनची तीन समस्थानिके आहेत. प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो. ड्यूटेरियमला जड हायड्रोजन असेही  म्हणतात. ट्रिशियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा.


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.