एजियन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एजियन समुद्राचा नकाशा (इंग्लिश मजकूर)

एजियन समुद्र (ग्रीक: Αιγαίο Πέλαγος, एजेओ पेलागोस; तुर्की: Ege Denizi;) हा दक्षिण बाल्कन प्रदेश व अनातोलियाचे द्वीपकल्प यांच्यादरम्यान, म्हणजेच ग्रीस आणि तुर्कस्तान देशांच्या मुख्यभूदरम्यान पसरलेला भूमध्य समुद्राचा खाडीसदृश भाग आहे. हा उत्तरेस मार्माराचा समुद्रकाळा समुद्र यांना दार्दानेलियाबोस्फोरस सामुद्रधुन्यांनी जोडला आहे. या समुद्राच्या पाण्याचा रंग अतिशय गडद निळा असा आहे. त्यामुळे बेटांबरून या समुद्राची दृश्ये अतिशय देखण्याजोगी आहेत.