सेल्टिक समुद्र
Appearance
सेल्टिक समुद्र (आयरिश: An Mhuir Cheilteach; वेल्श: Y Môr Celtaidd; कॉर्निश: An Mor Keltek; ब्रेतॉन: Ar Mor Keltiek; फ्रेंच: La mer Celtique) हा अटलांटिक महासागरामधील एक समुद्र आहे. हा समुद्र आयर्लंडच्या दक्षिणेस स्थित असून त्याच्या पूर्वेस इंग्लिश खाडी तर दक्षिणेस बिस्केचे आखात आहेत. युनायटेड किंग्डममधील वेल्स, कॉर्नवॉल व डेव्हॉन तर फ्रान्समधील ब्रत्तान्य हे भूभाग सेल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |