बोथनियाचे आखात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाल्टिक समुद्राचा नकाशा ज्यात उत्तरेला बोथनियाचे आखात आहे

बोथनियाचे आखात (फिनिश: Pohjanlahti पेरामेरी; स्वीडिश: Bottniska viken बॉटेनव्हिकेन) हे बाल्टिक समुद्राचे सर्वात उत्तरेकडील अंग आहे. हे आखात फिनलंडचा पश्चिम किनारा व स्वीडनचा पूर्व किनारा ह्यांमध्ये वसले आहे. आखाताच्या दक्षिणेला ऑलंड द्वीपसमूह आहेत.

याच्या पूर्वेस फिनलंड, पश्चिमेस स्वीडन आणि दक्षिणेस क्वार्केनची खाडी आहे. या अखातावर औलू, केमी आणि राहे ही बंदरे आहेत. या अखाताची खोली १४७ मी (४८२ फूट) इतकी आहे.

गुणक: 62°09′18″N 19°30′01″E / 62.15500°N 19.50028°E / 62.15500; 19.50028