Jump to content

साम्यवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साम्यवादाचे चिन्ह - हातोडा व कोयता
साम्यवाद

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

साम्यवाद ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे.

ह्या व्यवस्थेत उत्पादनाच्या मुख्य साधनांवर आणि स्रोतांवर कुणा एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नाही. म्हणजेच, उत्पादनाची मुख्य साधने आणि स्रोत संपूर्ण समाजाच्याच एकत्रित आधिपत्याखाली असावेत अशी साम्यवादाची मान्यता असते.

कामाची सर्वांत समान विभागणी, योग्यतेनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्व लाभ इत्यादी साम्यवादी विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत.

भांडवलवादाच्या प्रसारामुळे विसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी साम्यवादी विचारसरणी मागे पडत गेली. आजमितीस केवळ पाच देशांत (उत्तर कोरिया, व्हिएतनाम, लाओस, चीन आणि क्युबा) साम्यवादी राज्यव्यवस्था तग धरून आहे.

भारतातील साम्यवादाचे नेतृत्व पी.सी.जोशी, ए.के.गोपालन, बी.टी.रणदिवे, पी.सुंदरय्या यांनी केले.