हातोडा व कोयता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हातोडा व कोयता (☭) हे सम्यवादाच्या प्रतीकांपैकी एक चिन्ह आहे. ह्या चिन्हाचा वापर साम्यवाद, साम्यवादी राज्य किंवा साम्यवादी पक्षाशी संबंध दर्शवतो. ह्या चिन्हात एक हातोडा व एक कोयता एकमेकांवर ठेवल्याचे दिसते. ही दोन अवजारे क्रमशः शहरी औद्योगिक कामगारांना व ग्रामीण शेतकऱ्यांना दर्शवतात. ह्या दोन कष्टकरी वर्गांच्या एकजूटीला दर्शवण्यासाठी सदर अवजारे एकमेकांवर ठेवलेली दर्शवली आहेत. हे प्रतीक रशियन क्रांतीच्या दरम्यान उदयास आले. तद्नंतर अनेक झेंड्यांवर व प्रतीकांमध्ये ह्या चिन्हाचा वापर करण्यात आला आहे व त्यापैकी काहींमध्ये सोबत स्थानिक-संस्कृतीशी सुसंगत चिन्हेसुद्धा वापरलेली आहेत.

साम्यवादाच्या संदर्भात ऐतिहासिक वापर[संपादन]

वर्तमान वापर[संपादन]

चिन्हातील विविधता[संपादन]

युनिकोड[संपादन]

युनिकोड प्रणालीत "हातोडा व कोयता" () हे चिन्ह "hammer and sickle" ह्या नावाने U+262D ह्या क्रमांकावर समाविष्ट करण्यात आले आहे.

विवाद आणि वैधानिक स्थिती[संपादन]

गॅलरी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]