Jump to content

आफ्रिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अफ्रिका या पानावरून पुनर्निर्देशित)
आफ्रिका
आफ्रिका
आफ्रिका
क्षेत्रफळ ३,०२,२१,५३२ वर्ग किमी
लोकसंख्या १०० कोटी
स्वतंत्र देश ५६
संस्थाने व प्रांत

आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर, क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. त्याचे जवळच्या बेटांसह एकूण क्षेत्रफळ तीन कोटी दोन लाख चौरस किलोमीटर आहे. हा खंड पृथ्वीचा सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो. पृथ्वीतलावरील एकूण जमिनीच्या २०.४ टक्के जमीन या खंडात येते. इ. स. २००९ मध्ये आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे एक अब्ज, म्हणजेच पृथ्वीवरील लोकसंख्येच्या १४.७२ टक्के एवढी होती.

आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई द्वीपकल्प आहेत. आग्नेयेला हिंद महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहेत. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण ५६ सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.

आफ्रिकेत, विशेषतः पूर्व आफ्रिकेत मानववंशाची सुरुवात झाली अशी वैज्ञानिक समुदायाची मान्यता आहे. ग्रेट एप्सच्या रूपात त्यांची सुरुवात सुमारे सत्तर लाख वर्षांपूर्वी झाली असावी, असा अंदाज त्या भागात सापडलेल्या सर्वात जुन्या मानवी अवशेषांवरून करण्यात आला आहे. मानवाचे (होमो सेपियन्स) अस्तित्त्व दोन लाख वर्षांपूर्वी इथिओपिया देशात असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.

विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला आफ्रिका हा खंड आहे. आफ्रिकेत विविध भौगोलिक प्रदेश दिसून येतात. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.

नाम व्युत्पत्ती

[संपादन]

फोनेशियन ही भूमध्यसमुद्राच्या सभोवतालच्या प्रदेशात बोलली गेलेली एक प्राचीन भाषा आहे. या भाषेतील अफार (धूळ) हा शब्द आफ्रिका शब्दाच्या जवळ जाणारा आहे. उत्तर आफ्रिकेत कमी पर्जन्यमानामुळे अनेक प्रदेशात धुळीचे अस्तित्त्व मोठ्या प्रमाणात आजही दिसते. त्याचप्रमाणे एप्रिका (खूप सूर्यप्रकाश असलेला) या लॅटिन शब्दातही या शब्दाचे मूळ शोधले जाते. याखेरीज इतरही अनेक शब्दांमध्ये आफ्रिका शब्दाचे नामसाधर्म्य दिसून येते.

इतिहास

[संपादन]

सरीसृपांचे युग अशी ओळख असलेल्या मेसोझोईक काळात म्हणजे सुमारे २५ कोटी ते ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात आफ्रिकेत अवाढव्य आकाराच्या प्राण्यांचे अस्तित्त्व होते. डायनोसॉरचे जीवसृष्टीत प्राबल्य असलेला ज्युरासिक कालखंड याच युगाचा एक भाग होता. त्या काळातील प्राण्यांचे अवशेष आफ्रिकेत अनेक ठिकाणी सापडले आहेत. खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत असलेल्या मादागास्कर या प्रचंड बेटवजा देशामध्ये आढळलेल्या डायनॉसॉरसच्या पायांच्या अवशेषावरून, डायनॉसॉरस मांसाहारी होते या कल्पनेला पुष्टी मिळाली आहे.[]

आफ्रिका हा पृथ्वीवर मनुष्यवस्ती असलेला सर्वात जुना भूभाग आहे. आफ्रिकेचा इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास असे म्हणले जाते. आदिमानवाचा अर्थात होमो इरेक्टसच्या जीवनाचाही प्रारंभ १७ लाख ५० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतूनच झाला असे संशोधक मानतात. त्यानंतर आजच्या आधुनिक माणसाचा अर्थात होमो सपायन्सच्या जीवनाचा प्रारंभ जवळपास ३० ते ४० हजार वर्षांपूर्वी याच खंडात झाला. येथून पुढच्या काळात उत्तरेला युरोप आणि पूर्वेला आशिया खंडात मानवी वस्ती विस्तारत गेली.

लिखित इतिहासानुसार, इजिप्तमध्ये इसवी सनापूर्वी ३३०० वर्षे आधीच्या संस्कृतीचे अवशेष सापडतात. युरोपीयंच्या आफ्रिकेतील मोहिमांचा प्रारंभ ग्रीकांपासून झाला. अलेक्झांडर द ग्रेट याने इजिप्तचा बराचसा भूभाग जिंकून घेतला. त्याने अलेक्झांड्रिया शहर ही वसवले.

इसवी सनाच्या सातव्या शतकापासून अरबस्थानात स्थापन झालेल्या इस्लाम धर्माचा प्रभाव इजिप्तपर्यंत आणि नंतर आफ्रिकेत दक्षिण बाजूला विस्तारत गेला. त्याने आफ्रिकेत नव्याच संस्कृतीची भर घातली. नवव्या शतकापासून युरोपीयांनी आफ्रिकेत जम बसवला.

गुलामगिरीच्या अमानवी प्रथेला आफ्रिकेत मोठा इतिहास आहे. खंडाच्या पूर्व भागात, इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्रकाच्या सुरुवातीपासून अरबांचा गुलाम व्यापार (अरब स्लाव्ह ट्रेड) चालत होता. सोळाव्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत आफ्रिकेच्या पश्चिम भागातून अटलांटिक स्लाव्ह ट्रेड चालला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील राजकीय शक्तींनी आफ्रिकेतील वेगवेगळा प्रदेशात आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरू केले. त्यासाठी आपापसात संघर्ष झाले. या संघर्षांची परिणती म्हणून संपूर्ण आफ्रिका युरोपीय शक्तिंच्या वसाहतींनी व्यापला. या वसाहतवादातून आफ्रिका खंडातील देश मुक्त होण्याची प्रक्रिया इ.स. १९५३ मध्ये लिबियापासून सुरू झाली. इ.स. १९९३ पर्यंत आफ्रिका खंडातील बहुतांश देश स्वतंत्र झाले.

अर्थव्यवस्था

[संपादन]

आफ्रिका खंड जगात सर्वाधिक निर्धन आणि अविकसित राहिला आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. आजारांच्या साथी आणि विषाणूंचा फैलाव, मानवी हक्कांचे उल्लंघन, लाचखोर सरकारे, मध्यवर्ती नियोजनाचा अभाव, निरक्षरता, परदेशी भांडवलापर्यंत मर्यादितच पोहोच, जमाती-जमातींत किंवा लष्करांमधील संघर्ष ही त्यापैकी काही प्रमुख कारणे आहेत.

आफ्रिकेतील देश

[संपादन]

आफ्रिका खंडात पुढील देशांचा समावेश होतो

आफ्रिकेतील प्रदेश व देश क्षेत्रफळ
(चौरसग किमी)
लोकसंख्या
(१ जुलै २००२ रोजी)
लोकसंख्या घनता
(प्रति चौरस किमी)
राजधानी
पूर्व आफ्रिका:
बुरुंडी ध्वज बुरुंडी 27,830 6,373,002 229.0 बुजुंबुरा
Flag of the Comoros कोमोरोस 2,170 614,382 283.1 मोरोनी
जिबूती ध्वज जिबूती 23,000 472,810 20.6 जिबूती
इरिट्रिया ध्वज इरिट्रिया 121,320 4,465,651 36.8 अस्मारा
इथियोपिया ध्वज इथियोपिया 1,127,127 67,673,031 60.0 अदिस अबाबा
केन्या ध्वज केन्या 582,650 31,138,735 53.4 नैरोबी
मादागास्कर ध्वज मादागास्कर 587,040 16,473,477 28.1 अंतानानारिव्हो
मलावी ध्वज मलावी 118,480 10,701,824 90.3 लिलॉंग्वे
मॉरिशस ध्वज मॉरिशस 2,040 1,200,206 588.3 पोर्ट लुईस
मायोत ध्वज मायोत 374 170,879 456.9 मामौझू
मोझांबिक ध्वज मोझांबिक 801,590 19,607,519 24.5 मापुतो
रेयूनियों ध्वज रेयूनियों 2,512 743,981 296.2 सेंट डेनिस
रवांडा ध्वज र्‍वांडा 26,338 7,398,074 280.9 किगाली
Flag of the Seychelles सेशेल्स 455 80,098 176.0 व्हिक्टोरिया
सोमालिया ध्वज सोमालिया 637,657 7,753,310 12.2 मोगादिशु
टांझानिया ध्वज टांझानिया 945,087 37,187,939 39.3 डोडोमा
युगांडा ध्वज युगांडा 236,040 24,699,073 104.6 कंपाला
झांबिया ध्वज झांबिया 752,614 9,959,037 13.2 लुसाका
झिम्बाब्वे ध्वज झिंबाब्वे 390,580 11,376,676 29.1 हरारे
मध्य आफ्रिका:
अँगोला ध्वज अँगोला 1,246,700 10,593,171 8.5 लुआंडा
कामेरून ध्वज कामेरून 475,440 16,184,748 34.0 याऊंदे
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक 622,984 3,642,739 5.8 बांगुई
चाड ध्वज चाड 1,284,000 8,997,237 7.0 न्द्जामेना
Flag of the Republic of the Congo काँगो 342,000 2,958,448 8.7 ब्राझाव्हिल
Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक 2,345,410 55,225,478 23.5 किंशासा
इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी 28,051 498,144 17.8 मलाबो
गॅबन ध्वज गॅबन 267,667 1,233,353 4.6 लिब्रेव्हिल
साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप 1,001 170,372 170.2 साओ टोमे
उत्तर आफ्रिका:
अल्जीरिया ध्वज अल्जेरिया 2,381,740 32,277,942 13.6 अल्जीयर्स
इजिप्त इजिप्त [] 1,001,450 70,712,345 70.6 कैरो
लीबिया ध्वज लिबिया 1,759,540 5,368,585 3.1 त्रिपोली
मोरोक्को ध्वज मोरोक्को 446,550 31,167,783 69.8 रबात
सुदान ध्वज सुदान 2,505,810 37,090,298 14.8 खार्टूम
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया 163,610 9,815,644 60.0 ट्युनिस
पश्चिम सहारा पश्चिम सहारा [] 266,000 256,177 1.0 एल आयुन
उत्तर अफ्रिकेतील स्पॅनिश व पोर्तुगीज प्रदेश:
कॅनरी द्वीपसमूह कॅनरी द्वीपसमूह (स्पेन)[] 7,492 1,694,477 226.2 लास पामास दे ग्रॅन कॅनरिया,
सांता क्रूझ दे तेनेराईफ
सेउता सेउता (स्पेन)[] 20 71,505 3,575.2
मादेईरा मादेईरा (पोर्तुगाल)[] 797 245,000 307.4 फुंकल
मेलिया मेलिया [] 12 66,411 5,534.2
दक्षिण आफ्रिका:
बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना 600,370 1,591,232 2.7 गॅबोरोन
लेसोथो ध्वज लेसोठो 30,355 2,207,954 72.7 मासेरू
नामिबिया ध्वज नामिबिया 825,418 1,820,916 2.2 विंडह्योक
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका 1,219,912 43,647,658 35.8 ब्लोएमफॉंटेन, केप टाउन, प्रिटोरिया[]
इस्वाटिनी ध्वज स्वाझिलँड 17,363 1,123,605 64.7 एमबाबने
पश्चिम आफ्रिका:
बेनिन ध्वज बेनिन 112,620 6,787,625 60.3 पोर्तो-नोव्हो
बर्किना फासो ध्वज बर्किना फासो 274,200 12,603,185 46.0 Ouagadougou
केप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे 4,033 408,760 101.4 Praia
कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर 322,460 16,804,784 52.1 आबिजान, यामुसुक्रो[]
गांबिया ध्वज गांबिया 11,300 1,455,842 128.8 बंजुल
घाना ध्वज घाना 239,460 20,244,154 84.5 आक्रा
गिनी ध्वज गिनी 245,857 7,775,065 31.6 कोनाक्री
गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ 36,120 1,345,479 37.3 बिसाउ
लायबेरिया ध्वज लायबेरिया 111,370 3,288,198 29.5 मोन्रोविया
माली ध्वज माली 1,240,000 11,340,480 9.1 बामाको
मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया 1,030,700 2,828,858 2.7 नौक्कॉट
नायजर ध्वज नायजर 1,267,000 10,639,744 8.4 नियामे
नायजेरिया ध्वज नायजेरिया 923,768 129,934,911 140.7 अबुजा
सेंट हेलेना सेंट हेलेना (ब्रिटन) 410 7,317 17.8 जेम्सटाऊन
सेनेगाल ध्वज सेनेगल 196,190 10,589,571 54.0 डाकर
सियेरा लिओन ध्वज सिएरा लिओन 71,740 5,614,743 78.3 फ्रीटाउन
टोगो ध्वज टोगो 56,785 5,285,501 93.1 लोम
Total 30,368,609 843,705,143 27.8

आफ्रिकेवरील मराठी पुस्तके

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%B0.
  2. ^ इजिप्त हा देश बऱ्याचदा उत्तर आफ्रिका व पश्चिम आशियातील आंतरखंडीय देश मानला जातो.
  3. ^ पश्चिम सहारा हा मोरोक्को व सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक ह्यांच्यातील वादग्रस्त देश आहे.
  4. ^ The Spanish Canary Islands, of which Las Palmas de Gran Canaria are Santa Cruz de Tenerife are co-capitals, are often considered part of Northern Africa due to their relative proximity to Morocco and Western Sahara; population and area figures are for 2001.
  5. ^ The Spanish exclave of Ceuta is surrounded on land by Morocco in Northern Africa; population and area figures are for 2001.
  6. ^ The Portuguese Madeira Islands are often considered part of Northern Africa due to their relative proximity to Morocco; population and area figures are for 2001.
  7. ^ The Spanish exclave of Melilla is surrounded on land by Morocco in Northern Africa; population and area figures are for 2001.
  8. ^ Bloemfontein is the judicial capital of South Africa, while Cape Town is its legislative seat, and Pretoria is the country's administrative seat.
  9. ^ Yamoussoukro is the official capital of Côte d'Ivoire, while Abidjan is the de facto seat.