"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा (2) |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Draupadi humiliated RRV.jpg|thumb|right|250px|विराट राजाच्या दरबारात कीचकाकरवी अपमानित झालेली द्रौपदी (चित्रकार : [[राजा रविवर्मा]])]] |
[[चित्र:Draupadi humiliated RRV.jpg|thumb|right|250px|विराट राजाच्या दरबारात कीचकाकरवी अपमानित झालेली द्रौपदी (चित्रकार : [[राजा रविवर्मा]])]] |
||
'''द्रौपदी''' ही [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती [[पांचाल|पांचालाच्या]] राजा [[द्रुपद|द्रुपदाची]] दत्तक कन्या व पाच [[पांडव|पांडवांची]] |
'''द्रौपदी''' ही [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती [[पांचाल|पांचालाच्या]] राजा [[द्रुपद|द्रुपदाची]] दत्तक कन्या व पाच [[पांडव|पांडवांची]] पत्नी होती. महाभारत युद्धानंतर [[कौरव|कौरवांवर]] विजय मिळवून [[युधिष्ठिर]] [[हस्तिनापुर|हस्तिनापुराचा]] राजा बनल्यावर द्रौपदी पट्टराणी झाली. |
||
== जन्म == |
== जन्म == |
||
द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात |
द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवून अर्धे राज्य घेतल्यामुळे [[द्रोणाचार्य|द्रोणाचार्यांचा]] वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टध्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती. धृष्टध्युम्न व द्रौपदी यांना अयोनिसंभव असे म्हणत - म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयातून ज्यांचा जन्म झाला नाही असे. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे. |
||
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती [[पांचाल]] राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई. |
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती [[पांचाल]] राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई. |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा सम्राट द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी माशाचा डोळा नेम धरून फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला होता. मात्र कुंतीच्या तोंडून अनावधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील वरावे लागले. |
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा सम्राट द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी माशाचा डोळा नेम धरून फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला होता. मात्र कुंतीच्या तोंडून अनावधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील वरावे लागले. |
||
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी |
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा हिने गृहीणीपद व पतिची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच [[द्रौपदी-सत्यभामा-संवाद]] असे म्हणतात. |
||
== द्यूतप्रसंग आणि वस्त्रहरण == |
== द्यूतप्रसंग आणि वस्त्रहरण == |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
== वनवासात आणि महाभारतीय युद्धात == |
== वनवासात आणि महाभारतीय युद्धात == |
||
वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा |
वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्न कौरवांचा मेव्हणा व [[दुःशला|दुःशलेचा]] पती [[जयद्रथ]] याने केला होता. मात्र युधिष्ठिरामुळे त्याला जीवदान मिळाले. अज्ञातवासाच्या काळात द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी. [[विराट]] राजाची पत्नी [[सुदेष्णा]] हिच्या महालात सैरंध्रीच्या रूपात काम करतानादेखील सुदेष्णेचा भाऊ व विराट राजाचा सेनापती [[कीचक]] याने द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. |
||
द्रौपदीने विवाहापूर्वी अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा पति म्हणजे भीम. |
द्रौपदीने विवाहापूर्वी अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा पति म्हणजे भीम. द्यूतप्रसंगी दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिशोध म्हणून त्याने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती, जी त्याने महाभारताच्या युद्धात पूर्ण केली. वनवासामध्ये तिला सुवर्णकमळे हवी असतानादेखील आपले कौशल्य पणास लावणारा भीमच होता. ती सैरंध्रीच्या रूपात असताना तिच्यावर अतिप्रसंग करू पहाणार्या [[कीचक|कीचकाचा]] वध करण्याचं काम भीमानेच केले होते. |
||
द्रौपदीला युधिष्ठिरापासून [[प्रतिविंध्य]], भीमापासून [[श्रुतसोम]], अर्जुनापासून [[श्रुतकर्मा]], नकुलापासून [[शतानीक]] व सहदेवापासून [[श्रुतसेन]] असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने [[द्रोणाचार्य]] |
द्रौपदीला युधिष्ठिरापासून [[प्रतिविंध्य]], भीमापासून [[श्रुतसोम]], अर्जुनापासून [[श्रुतकर्मा]], नकुलापासून [[शतानीक]] व सहदेवापासून [[श्रुतसेन]] असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने [[द्रोणाचार्य]]-पुत्र [[अश्वत्थामा]] याने महाभारत युद्धसमाप्तीनंतर एके रात्री एकाच राहुटीमधे झोपलेल्या या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात पाच पांडवांसह निवृत्तीसाठी द्रौपदीनेदेखील नगेंद्र हिमालयाचा मार्ग धरला होता. मात्र पर्वताच्या पायथ्याशीच ती कोसळून पडली. |
||
==द्रौपदी या महाभारतातील व्यक्तिरेखेवर अनेक पुस्तके लिहिली गेली; त्यांपैकी काही ही :- |
|||
* द्रौपदी (हिंदी, लेखिका - प्रतिभा राय) |
|||
* द्रौपदी की आत्मकथा (हिंदी, लेखिका - मनु शर्मा) |
|||
* पांचाली (लेखिका - डॉ. [[सुमती क्षेत्रमाडे]]) |
|||
* पांचालीचे महाभारत - मयसभा (मूळ : द्रौपदी की महाभारत, हिंदी लेखिका - चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी, मराठी अनुवाद - डॉ. प्रतिमा काटीकर) |
|||
* सती द्रौपदी (हिंदी, लेखक - स्वामी अखण्डानन्द सरस्वती) |
|||
== हेही पहा == |
== हेही पहा == |
०१:१६, १७ जुलै २०१६ ची आवृत्ती
द्रौपदी ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती पांचालाच्या राजा द्रुपदाची दत्तक कन्या व पाच पांडवांची पत्नी होती. महाभारत युद्धानंतर कौरवांवर विजय मिळवून युधिष्ठिर हस्तिनापुराचा राजा बनल्यावर द्रौपदी पट्टराणी झाली.
जन्म
द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवून अर्धे राज्य घेतल्यामुळे द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टध्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती. धृष्टध्युम्न व द्रौपदी यांना अयोनिसंभव असे म्हणत - म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयातून ज्यांचा जन्म झाला नाही असे. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे.
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती पांचाल राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई.
द्रौपदी शिखंडीची बहीण होती. कृष्ण हा दौपदीचा सखा होता.
पण व पांडवांशी विवाह
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा सम्राट द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी माशाचा डोळा नेम धरून फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला होता. मात्र कुंतीच्या तोंडून अनावधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील वरावे लागले.
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा हिने गृहीणीपद व पतिची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच द्रौपदी-सत्यभामा-संवाद असे म्हणतात.
द्यूतप्रसंग आणि वस्त्रहरण
द्यूतप्रसंगी धृतराष्ट्र पुत्र दुर्योधन व दु:शासनाकरवी झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जीवनातील सर्वात मोठा मानहानीचा प्रसंग होता. त्या प्रसंगातदेखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बुद्धिमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती. "माझ्या पतीने आधी स्वत:ला पणाला लावले असल्यास नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का?" या तिच्या प्रश्नाने भीष्म पितामहांनादेखील निरूत्तर केले होते. वस्त्रहरणासारख्या प्रसंगामधे पतींनी सर्व अधिकार गमावल्यानंतर द्रौपदीने आपला सखा कृष्ण याचा धावा केला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देत कृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण केले.
दुर्योधन व दु:शासनाच्या हीन कृतींकडे दुर्लक्ष करणार्या धृतराष्ट्रालादेखील द्रौपदीच्या वक्तव्याची दखल घेणं भाग पडलं होतं. आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचविण्यासाठी धृतराष्ट्राने तिला अनेक वरदाने देऊ केली होती, मात्र क्षत्रिय स्त्रीच्या धर्मानुसार आपल्याला केवळ दोनच वर मागण्याचा अधिकार आहे, असे उत्तर देऊन द्रौपदीने स्वत:वर ओढवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगातदेखील आपल्या इच्छांवर असलेला संयम व ताळ्यावर असलेले चित्त दाखवून दिले होते. द्रौपदीच्या चतुराईमुळेच पांडव व त्यांचे पुत्र, त्यांच्या रथ व अस्त्र शस्त्रांसकट दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते व त्यांना त्यांचे राज्यदेखील परत मिळाले होते. पण युधिष्ठीराच्या द्यूलालसेमुळे त्यांना पुढच्याच क्षणी राज्य गमवावे देखील लागले व बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास त्यांच्या नशीबी आला.
द्रौपदीने अशी प्रतिज्ञा केली होती की तिच्या केसांना धरून ओढणार्या दु:शासनाच्या छातीचे रक्त जोपर्यंत ती आपल्या केसांना लावणार नाही, तोपर्यंत ती केस मोकळेच ठेवेल. भीमाने महाभारतातील युद्धामधे दु:शासनाचा वध करून, त्याची छाती फोडली आणि त्याचे रक्त द्रौपदीच्या केसांना लावून तिची वेणी घातली व द्रौपदीची प्रतिज्ञा पूर्ण केली.
वनवासात आणि महाभारतीय युद्धात
वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्न कौरवांचा मेव्हणा व दुःशलेचा पती जयद्रथ याने केला होता. मात्र युधिष्ठिरामुळे त्याला जीवदान मिळाले. अज्ञातवासाच्या काळात द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी. विराट राजाची पत्नी सुदेष्णा हिच्या महालात सैरंध्रीच्या रूपात काम करतानादेखील सुदेष्णेचा भाऊ व विराट राजाचा सेनापती कीचक याने द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
द्रौपदीने विवाहापूर्वी अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा पति म्हणजे भीम. द्यूतप्रसंगी दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिशोध म्हणून त्याने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती, जी त्याने महाभारताच्या युद्धात पूर्ण केली. वनवासामध्ये तिला सुवर्णकमळे हवी असतानादेखील आपले कौशल्य पणास लावणारा भीमच होता. ती सैरंध्रीच्या रूपात असताना तिच्यावर अतिप्रसंग करू पहाणार्या कीचकाचा वध करण्याचं काम भीमानेच केले होते.
द्रौपदीला युधिष्ठिरापासून प्रतिविंध्य, भीमापासून श्रुतसोम, अर्जुनापासून श्रुतकर्मा, नकुलापासून शतानीक व सहदेवापासून श्रुतसेन असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने द्रोणाचार्य-पुत्र अश्वत्थामा याने महाभारत युद्धसमाप्तीनंतर एके रात्री एकाच राहुटीमधे झोपलेल्या या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात पाच पांडवांसह निवृत्तीसाठी द्रौपदीनेदेखील नगेंद्र हिमालयाचा मार्ग धरला होता. मात्र पर्वताच्या पायथ्याशीच ती कोसळून पडली.
==द्रौपदी या महाभारतातील व्यक्तिरेखेवर अनेक पुस्तके लिहिली गेली; त्यांपैकी काही ही :-
- द्रौपदी (हिंदी, लेखिका - प्रतिभा राय)
- द्रौपदी की आत्मकथा (हिंदी, लेखिका - मनु शर्मा)
- पांचाली (लेखिका - डॉ. सुमती क्षेत्रमाडे)
- पांचालीचे महाभारत - मयसभा (मूळ : द्रौपदी की महाभारत, हिंदी लेखिका - चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी, मराठी अनुवाद - डॉ. प्रतिमा काटीकर)
- सती द्रौपदी (हिंदी, लेखक - स्वामी अखण्डानन्द सरस्वती)
हेही पहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |