मेघालय उच्च न्यायालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेघालय उच्च न्यायालय (mr); Meghalaya High Court (en); மேகாலயா உயர் நீதிமன்றம் (ta); मेघालय उच्च न्यायालय (hi); मेघालय उच्च न्यायालय (awa) High Court for Indian state of Meghalaya (en); भारतीय राज्य मेघालय का उच्च न्यायालय (hi); High Court for Indian state of Meghalaya (en) மேகாலயா உயர்நீதி மன்றம் (ta)
मेघालय उच्च न्यायालय 
High Court for Indian state of Meghalaya
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारअपीलीय न्यायालये
स्थान शिलाँग, पूर्व खासी हिल्स जिल्हा, मेघालय, भारत
कार्यक्षेत्र भागमेघालय
स्थापना
  • मार्च २३, इ.स. २०१३
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मेघालय उच्च न्यायालय हे मेघालय राज्याचे उच्च न्यायालय आहे. भारताच्या राज्यघटनेत आणि उत्तर-पूर्व क्षेत्र (पुनर्रचना) कायद्यात (१९७१) योग्य सुधारणा करून मार्च २०१३मध्ये याची स्थापना करण्यात आली. यापूर्वी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे मेघालय राज्याचा अधिकार होता. उच्च न्यायालयाची जागा मेघालयची राजधानी शिलाँग येथे आहे.

या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या माननीय मुख्य न्यायाधीश आणि ३ माननीय न्यायाधीशांसह ४ स्थायी न्यायाधीश आहे. सध्याचे सरन्यायाधीश हे माननीय न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी आहेत ज्यांनी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पदभार स्वीकारला.[१]

मुख्य न्यायाधीशांची यादी[संपादन]

# मुख्य न्यायाधीश कार्यकाळ
सुरू समाप्त
1 टी. मीना कुमारी 23 March 2013 3 August 2013
2 प्रफुल्ल चंद्र पंत 20 September 2013 12 August 2014
3 उमानाथ सिंग 19 March 2015 14 January 2016
4 दिनेश महेश्वरी 24 February 2016 12 February 2018
5 तरुण अगरवाला 12 February 2018 2 March 2018
6 मोहम्मद याकुब मीर 21 May 2018 27 May 2019
7 अजय कुमार मित्तल 28 May 2019 2 November 2019
8 मोहम्मद रफीक 13 November 2019 26 April 2020
9 बिश्वनाथ सोमद्दर 27 April 2020 11 October 2021
10 रणजित वसंतराव मोरे 12 October 2021 3 November 2021
11 संजीब बनर्जी 24 November 2021 कार्यरत

संदर्भ[संपादन]

  1. ^ "High Court of Meghalaya". web.archive.org. 2013-06-09. Archived from the original on 2013-06-09. 2022-04-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)