माद्री
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
माद्री ही महाभारतातील कथेमधील मद्र देशाची राजकन्या असते. ती कुरू सम्राट पांडूची द्वितीय पत्नी असते व नकुल व सहदेव या पाडूंपुत्रांची माता असते.
पांडू जेव्हा दिग्विजयाच्या यात्रेवर निघालेला असतो त्यावेळेस मद्र देशाचा राजा शल्य विरोधाच्या ऍवजी मैत्रीचा प्रस्ताव पांडू पुढे ठेवतो व आपली बहीण माद्री हिला द्वितीय पत्नी म्हणून स्वीकारावे अशी विनंती करतो. माद्रीच्या रूपावर आकर्षीत होऊन पाडूं माद्रीला आपली पत्नी म्हणून स्वीकार करतो. माद्रीला द्वितीय पत्नी म्हणून कुंती स्वीकारेल की नाही अश्या चिंतेत असतानाच माद्री कुंती व इतर कुरू जनांचे मन जिंकुन घेते. किंदम ऋषींच्या शापामुळे पांडू राज्यत्याग करतो व आपल्या दोन्ही पत्नीसोबत वनवासात रहातो. कुंतीला दुर्वास ऋषींच्या युधिष्ठीर, भीम व अर्जुन या पुत्रांची मंत्राने पुत्रप्राप्ती झाल्यानंतर कुंती माद्रीला तो मंत्र देते ज्याच्या प्रभावाने माद्रीला अश्वीनीकुमारांच्या प्रभावाने नकुल व सहदेव हे दोन पुत्र होतात. काही वर्षे वनवासात काढल्यानंतर एकदिवशी माद्री अंघोळ करून येत असताना. तिच्या रूपाकडे पाहून पांडूचा संयम तुटतो व माद्रीशी प्रणय करु पहातो. परंतु किंदम ऋषींच्या शापाने पांडूचा जागीच मृत्यु होतो. माद्री याचे प्रायश्चित्त म्हणून पांडूच्या चितेत सती जाते.