Jump to content

महाराजबाग (नागपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुमारे १५ एकर परीसरात पसरलेली नागपूरची महाराजबाग ही सुमारे १२० वर्ष जुनी आहे. बाग तसेच प्राणीसंग्रहालय असे तिचे स्वरूप आहे.इ.स. १८९५ साली 'पंजाबराव कृषी विद्यापिठाची' स्थापना झाल्यावर त्या निमित्ताने येथे अनेक दुर्मिळ वनस्पती लावण्यात आल्या.मॅहोगनी, गोरखचिंच, कदंब काळा अंकोल, नागलिंगम, रक्तचंदन, शिरणी, कुसुम इत्यादी वनस्पती येथे उपलब्ध आहेत.येथे शेजारीच आंबेवाडी आहे. तेथे नागीण जातीचे आंब्याचे वृक्ष आहेत.चिकु फणस इत्यादी नेहमी दिसणारे वृक्षही येथे आहेत.

वनस्पतींनी हिरव्या परीसरामुळे, येथे सकाळच्या वेळी अनेक पक्षी बघावयास मिळतात.वटवट्या, शिंजीर, तांबट, सातभाई, दयाळ, सुतार, हळद्या, निलकंठ, टाकचोर, खंड्या,कोतवाल, साळुंकी, भारद्वाज इत्यादी पक्षीही इतर सामान्य पक्षांसमवेत दिसतात.

येथे प्राणी संग्रहालयही आहे. मोर व लांडोर, वाघ, अस्वल, हरीण,काळवीट, सांबर,ससे,बगळे,बदके काकाकुवा इत्यादी प्राणी व पक्षी पिंजराबंद आहेत.

येथे सुटीच्या दिवशी भेट देणाऱ्यांची जास्त गर्दी असते.