काकाकुवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'

पांढरा काकाकुवा

काकाकुवा हा सिटॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा ८० वर्षे जगू शकतो. काळ्या पाम काकाकुवा हे एक दुर्मिळ आणि निर्विवाद बहुतेक सुंदर प्रजातींपैकी एक आहे. गॅला, कोरल आणि काही काळ्या काकाकुवा प्रामुख्याने जमिनीवर अन्न खातात; इतर मुख्यतः झाडावर आपले अन्न ठेवतात.

वास्तव्य[संपादन]

सात जाती फिलीपिन्स, इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी आणि सोलोमन द्वीपसमूहातील आढळतात. न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही ठिकाणी तीन प्रजाती आढळतात. ईतर काकाकुवा प्रजाती ह्या जंगली वस्ती, झुडुपं आणि जंगले यामध्ये वास्तव्य करतात.

आवाज[संपादन]

काकाकुवांचे उच्चारण उच्च आणि कठोर असते. इतरांना भक्षकापासून सावध करण्यासाठी ते आवाज करतात. ते कळपातील पिल्लाचे संगोपन करतात. घरट्यांचा बचाव करताना चेतावणी देण्याचे काम करतात. काकाकुवा प्रजातीदेखील धोक्याच्या वेळी वैशिष्ट्यपूर्ण आवाज करतात. काकाकुवा हा पक्षी ईतर पक्ष्यांपेक्षा जास्त मोठ्याने ओरडू शकतो. एका काकाकुवाचे ओरडणे जवळजवळ १ मैल पर्यंत ऐकू येते.

वागणूक[संपादन]

काकाकुवाच्या सर्व प्रजाती ह्या रंगीबेरंगी आणि गोंगाट करणाऱ्या असतात. त्या कळपाने राहतात त्यामध्ये शंभर किंवा त्यापेक्षा जास्त पक्षी असतात. काही काकाकुवा हे प्रेमळ असतात तर इतर बरेच आक्रमक असतात.

पाळीव पक्षी[संपादन]

काकाकुवा हा एक माणसाळण्याजोगा व घरात पाळता येण्यादारखा पक्षी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी काकाकुवा पाहायला मिळतो. हा लोकप्रिय पक्षी असून त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि गतिशील आहे. नर आणि मादी एकसारखे आहेत. ते जोडीने राहणे पसंत करतात. जर मालकाने त्याचाकडे लक्ष दिले नाही तर ते निराशही होतात. त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. जे पाळीव काकाकुवा असतात त्यांचामध्ये लठ्ठपणा ही एक समस्या असते, ती टाळण्यासाठी त्यांचा आहाराची काळजी घ्यावी लागते. फॉरेस्ट काकाकुवा हे साधारणपणे रागीट असतात.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

http://cockatoo-info.com/ Archived 2018-06-03 at the Wayback Machine.

https://www.informationvine.com/index?qsrc=999&qo=semQuery&ad=semD&o=603075&l=sem&askid=4289a2fb-1aa9-4b8f-87b3-dc6af8c00f50-0-iv_gsb&q=cockatoo%20information&dqi=&am=broad&an=google_s[permanent dead link]

http://animal-world.com/encyclo/birds/cockatoos/CockatoosProfile.htm

http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92a91594d937940/91593e91593e91594193593e-cockatoo