अंकोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पहा अंकुल


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वनस्पतीशास्त्रीय नाव: Alangium salviifolium
कुळ: Alangiaceae

वेगवेगळ्या भाषांतील नावे[संपादन]

संस्कृत=अंकोट,अंकोल
हिंदी=ढेरा/टेरा
बंगाली=धल/आंकोट, धलाकुर, धलाआंक्रा
गुजराती=अंकोल
मल्याळम=अंकोलम्
तमिळ=अंकोलम्
तेलुगू=अंकोलम्,अंकोलमु
कन्नड=अंकोलेमर
इंग्लिश=Sage-leaf Alangium


वर्णन[संपादन]

अंकोलाचा जंगली वृक्ष बराच मोठा व सुबक असतो. भारतात बहुधा सर्वच राज्यात ही झाडे उगवतात. फांद्या वेड्यावाकड्या असतात. साल राखी रंगाची, जाड व खडबडीत असते. मूळ जड, पिवळे, तेलकट व टणक असते. मुळाची साल दालचिनीपेक्षा जरा उदी रंगाची असते. पालवी बाराही महिने असते, परंतु फुले येण्याच्या सुमारास पाने गळतात. काट्यांची व काटेरहित अशा दोन जाती आहेत. पाने बोटभर रुंद व कण्हेरीच्या पानासारखीं लांबट असून त्यांवर ढोबळ शिरा असतात. फुले शुभ्र, सुवासिक व झुबक्यांनी येतात. फळे तांबूस जांभळ्या रंगाची व बोराएवढी, गोलाकार असतात. बियांपासून तेल निघते. मुळाची साल, पाने व बियांचे तेल औषधांत वापरतात. तेलाची चव कडू व वास किळसवाणा असतो.[१]

रसशास्त्र[संपादन]

हे मुळात फार कडू द्रव्य आहे. हे अल्कोहोलमध्ये मिसळते, परंतु पाण्यात मिसळत नाही.

गुण[संपादन]

अंकोलाच्या मुळाची साल कडू व उष्ण आहे. तिची प्रत्यक्ष क्रिया पचननलिकेच्या श्लेष्मलत्वचेवर होत असते. लहान प्रमाणात दिल्यास आमाशयाची व आंतड्याची शक्ति वाढते, पित्तस्राव बरा होतो, शौचास साफ होते, जराशी मळमळ होऊन कफ ढिला होतो, त्वचा ओली होते व त्वचेची विनिमयक्रिया सुधारते. हे अंकोलाचे धर्म रूईसारखे आहेत. मोठ्या प्रमाणात दिल्यास उलटी होते व पाण्यासारखे कफ व पित्तमिश्रित जुलाब होतात. जुलाब होताना लघवीचे प्रमाण वाढते. अंकोलाने निःसंशय उलटी होते खरी, तरी ह्याची वामक द्रव्यांत गणना करू नये व वामक म्हणून वापरू नये. वांती होण्याकरिता अंकोल मोठ्या मात्रेंत द्यावे लागते व अशा मात्रेंत दिले तरी वांती होण्यास वेळ लागतो. वांती होत असतांना व झाल्यानंतर ह्रदय व रक्तवाहिन्या ह्यांस बराच थकवा व शिथिलता येते. आमाशयाच्या श्लेष्मलत्वचेवर वांतीचे वेळी ह्याची प्रत्यक्ष क्रिया होत असल्याकारणाने तेथे दाह होतो व केव्हाकेव्हा शोथही उत्पन्न होतो. ह्या क्रियेवरून अंकोल हे मोठ्या मात्रेत वापरता येत नाही हे स्पष्ट होते. हे दोष रूईत नाहीत. अंकोल विषबाधेवर वापरतात. सर्पविष व उंदराचे विष यांवरील उपचारांच्याबाबतीत प्राचीन वैद्यांनी अंकोलाची स्तुती केली आहे.

अंकोल स्वेदजनन, शोथन करणारे, (त्वचादोषहर), आनुलोमिक व विषहर आहे. यांत कासहर हा विशेष धर्म आहे व दाहजनक आणि वामक हा त्याचा दोष आहे. मात्रा:- मुळाची साल १ ते ३ गुंजाप्रमाणे दिल्यास घाम सुटतो, मळमळते व कफ ढिला होतो. २० ते २५ गुंजा दिली असतां उलटी होते; सर्पविषबाधेत २० गुंजाप्रमाणे देतात. अंकोलाचे अनुपान तांदळाची पेज किंवा धुवण आहे.

उपयोग[संपादन]

  1. अंकोलाच्या मुळाची साल रूईप्रमाणे सर्व तऱ्हेच्या त्वचारोगांत वापरतात. उपदंश, रक्तपित्ती, अंगावर मोठाले लाल रंगाचे चट्टे उठणे, चाई व व्रण ह्या रोगांत १/२ ते १ गुंज या प्रमाणाने दिवसांतून तीन वेळा देतात आणि बियांचे तेल किंवा मूळ उगाळून लावतात. अशा लहान मात्रेंत अंकोल बरेच दिवस द्यावा लागतो.
  2. सर्दी, मोड्या ताप (एन्फ्लुएन्झा) किंवा सांधे दुखून येणारा ताप (डेंग्यू) ह्यांत अंकोलाचे मूळ वेखंड किंवा सुंठीबरोबर पेजेत उकडून देतात आणि पाने ठेचून व जराशी गरम करून वायूने दुखत असलेल्या भागावर बांधतात.
  3. यकृदुदर, जलोदर व मूत्रपिंडोदर ह्यांत अंकोलाच्या मुळाची साल १ वाल प्रमाणाने देतात. ह्याने जुलाब होतात व यकृताची क्रिया सुधारते. ह्या रोगांत लघवीचे प्रमाण जास्त वाढण्यासाठी काळ्या तिळाच्या झाडाचा क्षार अथवा जवखार अंकोलाबरोबर दिल्यास चालतो. कबज आणि जंत असल्यास याचा उपयोग करतात.
  4. उंदराच्या विषारावर अंकोल हे उत्तम औषध आहे असे गुजराथेंतील वैद्य मानतात. सर्पविषारांतही याचा उपयोग करितात.

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. ^ औषधी वनस्पती विज्ञान - ले.डॉ वामन गणेश देसाई