सातभाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सातभाई
सातभाई
शास्त्रीय नाव टरडॉइड्स माल्कोमी
कुळ टिमालीडे
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश लार्ज ग्रे बॅबलर
संस्कृत हहोलिका
हिंदी गैगई, घुघोई

सातभाई (शास्त्रीय नाव:टरडॉइड्स माल्कोमी) हा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये लार्ज ग्रे बॅबलर असे नाव आहे.

या पक्षाचे कपाळ राखाडी रंगाचे आणि संपूर्ण शरीर तपकिरी रंगाचे असते. हा पक्षी उडत असताना फुलवलेल्या शेपटीची बाहेरची पिसे पांढरट दिसतात,त्याची शेपूट लांब सडक असून शेपटीची मधली पिसे सर्वात लांब आणि कडेची पिसे लहान असतात.सातभाई नेहमी सातच्या संख्येत दिसतातअसा समज आहे.मात्र ८-१० पक्षांपासून २०-२२ पक्षांपर्यंत ही थवे दिसून येतात.हे पक्षी छोट्यामोठ्या थव्यांमध्ये विखुरलेले असतात. जमिनीवरचे किडे,वाळव्या ,अळ्या,आणि गवताच्या बिया हा त्यांचा मुख्य आहार असतो. थव्यातला एक पक्षी जवळच्या झाडाच्या शेंड्यावर बसून टेहाळनीचे काम करतो. एखादा शिकारी पक्षी दिसला की विशिष्ट आवाज काढून जमिनीवर खाद्य शोधात असणाऱ्या पक्षांना सावध करतो. धोक्याचा इशारा मिळताच जमिनीवरचे सर्व पक्षी ताबडतोब जवळच्या एखाद्या झाडावर किवा झुडपात दडून बसतात. झाडावर बसून टेहळणी करण्याचे काम थव्यातले पक्षी आलटून पालटून करतात.

रामायण कालीन संदर्भ[संपादन]

सातभाई या पक्षाला महाराष्ट्रातील काही जनसमुदाय कोंघी या नावाने ओळखतो. ह्या पक्षाचा आवाज कोय कोय कोय असा आहे. अशी आख्यायिका आहे की, रामायण ह्या ग्रंथामध्ये या पक्षाचा संदर्भ येतो. सीता शोधण्यासाठी राम वनामध्ये बाहेर पडतात. रस्त्यावरून चालताना ह्या पक्षांच्या ओरडण्याने रामास त्रास झाल्याने त्यांचा चेहेरा चिडचिडा दिसत होता. लक्ष्मणास जाणविल्याने लक्ष्मण शाप देतो. त्यामुळे हा पक्षी विशिष्ट ऋतुकालात काळात ओरडत नाही. अशी त्यामागची अख्यायिका आहे.