भारद्वाज (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


भारद्वाज (पक्षी)
Greater Coucal I IMG 7775.jpg
अन्य भाषांतील नावे
हिंदी महोख
Centropus sinensis + Centropus toulou

भारद्वाज (इंग्लिश:Greater Coucal) हा भारतात आणि पूर्व आशियामध्ये दिसणारा पक्षी आहे. हा भारतापासून ते दक्षिण चीनइंडोनेशिया पर्यंत आढळतो.

अधिक माहिती[संपादन]

मराठीत भारद्वाज, कुंभार कावळा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी डोमकावळ्याच्या आकाराचा आहे.तसेच याला पान कावळा, लाल कावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्क्कुटकुंबा, कुक्कुडकोंबा या नावानेही ओळखतात.[१] याला इंग्रजीत Greater Coucal or Crow Pheasant असे म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस साईनेसिस (Centropus sinesis) असे आहे. भारद्वाजही ककु कुटुंबातील सदस्य असला तरी हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून जाणारा पक्षी नाही.

झुडपी जंगल, खुले मैदानी प्रदेश, गवताळ प्रदेश अशा भागात आणि मनुष्य वसतीजवळच राहणे पसंत असलेला भारद्वाज, जास्तवेळ जमिनीवर राहतो. नर-मादी सारखेच दिसतात. लहान-मोठे किडे, पाली, सुरवंट, उंदीर,सरडा हे याचे मुख्य अन्न आहे.

एकाने कुप कुप कुप करत आवाज सुरू केला की दुसरा लगेच तसाच आवाज काढतो आणि हा खेळ एका मागे एक ५ ते २० वेळापर्यंत आवाज काढून सुरूच राहतो. भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. या पक्षाचा पंख देवक म्हणुन रेडे-पाटील आडनाव असलेल्या तसेच पूर्वापार चालत आलेल्या प्रथे प्रमाणे ज्यांचे देवक आहे तो ९६ कुळी मराठा समाज लग्न समारंभाला हया पक्षाचा पंख पुजतात.

शहर पक्षी[संपादन]

भारद्वाज सावंतवाडीचा शहरपक्षी म्हणून निवडून आला आहे. मलबारी कर्णा या पक्ष्याला त्याने हरवले.


संदर्भ[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत