छत्रपती राजारामराजे भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


छत्रपती राजारामराजे भोसले
छत्रपती
Rajaram-maharaj.JPG
छत्रपती राजारामराजे भोसले यांचे अस्सल चित्र
अधिकारकाळ १६८९ - १७००
राज्याभिषेक १६८९
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी जिंजी
पूर्ण नाव राजारामराजे शिवाजीराजे भोसले
मृत्यू १७००
सिंहगड
उत्तराधिकारी छत्रपती ताराराणी भोसले
वडील शिवाजीराजे भोसले
आई सोयराबाई
पत्नी जानकीबाई,
ताराबाई
राजघराणे भोसले,सिसोदिया(भोसावत)
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)

राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. संभाजीच्या मृत्युनंतर (१६८९ ते १७००) मराठी स्वराज्याचा अतिशय अवघड काळात त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सरदारांच्या साहाय्याने नेतृत्त्व केले. कारकिर्दीतील त्यांनी मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व स्वराज्याची धुरा सांभाळली. इ.स. १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यु झाला.